छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी
(छत्रपती संभाजीनगर) दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोज बळीपाडवा उत्सव समिती, छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित संविभागी महासम्राट बळीराजा महोत्सव -२०२३ संपन्न केला गेला.आज सुद्धा आया भगिनी दसरा दिवाळीला ज्या राजाची आपुलकीने वाट पाहत आहेत. तो राजा म्हणजे सम्राट बळीराजा.
ईडा पिडा टळो, बळीच राज्य येवो! अशी आठवण आज सुद्धा कृषीसंस्कृतीच्या स्त्रिया आवर्जून काढतात.
बळीराजाची ओळख
हिरण्यकश्यपूचा नातू… सांख्यदर्शनाचा प्रवर्तक प्रल्हादचा पुतण्या….विरोचनचा पुत्र बळी…..
बळीचा पुत्र बाणासुर
बळीराजाबद्दल गौरवोदगार संत नामदेव, बसवन्ना, संत जनाबाई, संत तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून करतात.
संत तुकाराम महाराज तर थेट विष्णू लाच प्रश्न विचारतात…..
“हरी तूं निष्ठुर निर्गुण ।
नाहीं माया बहु कठिण ।
नव्हे तें करिसी आन ।
कवणें नाहीं केलें तें ॥
बळी सर्वस्वें उदार ।
जेणें उभारिला कर ।
करूनि काहार ।
तो पाताळीं घातला ॥”
तात्यासाहेब म. जोतीराव फुले सुद्धा बळीराजावर पवाडा लिहितात
आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर । होते रणधीर । स्मरुत्यास।। बळीस्थानी आले शूर भैरोबा । खंडोबा, जोतिबा । महासुभा ।। सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी। दशहरा, दिवाळी । आठविती ।। क्षत्रिय भार्या “इडा पिडा जाओ । बळी राज्य येवो ।” अशा का बा ? आर्य भट आले, सुवर्ण लुटिले । क्षत्री दास केले । बापमत्ता।। वामन का घाली बळी रसातळी । प्रश्न जोतीमाळी । करी भटा ।।
छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात बळीमहोत्सव खालीलप्रमाणे साजरा करण्यात आला
1] सजविलेल्या बैलगाडीचे बैलांसह औक्षण संध्या जाधव, विमल रंधे, लता धम्मकीर्ती,अर्चना तांबे, निकिता जाधव, रूपाली व कांचन देवकर, कुसुम डामरे, अनिता देवतकर, प्रतिभा बोरसे आदी.महिलांनी केले.
2]शेतकरी श्री नवपुते व गाजरे यांचा सत्कार शाल, टोपी व पुस्तकं देऊन सत्कार विलास जाधव यांनी केला.
3] सम्राट बळीराजाच्या प्रतिमेचे औक्षण महिलांनी केले.
4] सूत्रसंचालन ईश्वर दनके यांनी तर प्रास्ताविक अरविंद खैरनार यांनी केले.
5] के ई हरदास, प्रभाकर गायकवाड, विजय वानखेडे, कबीरानंद गुरुजी, विष्णू वखरे यांनी मनोगत व्यक्त केले.
6] अध्यक्षीय मनोगत डॉ प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केले.
7] सार्वजनिक सत्यधर्माच्या प्रार्थनेचे सामूहिक गायन झाले.8] साळूबा पांडव हे महात्मा जोतीराव फुले यांच्या पेहेरावात हे उत्सावाच खास वैशिष्ट्य9] सर्वांचे आभार धम्मकीर्ती यांनी मानले.सर्व कृषीसंस्कृतीला प्रेरणास्थान मानणाऱ्या सर्व समविचारी चळवळीचें कार्यकर्ते उपस्थित होते.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231114-WA0069-1024x461.jpg)