दिवाळी व भाऊबीज निमित्त संतोषभाऊ कुरमेलवार यांच्या कडून गरजूंना मदत

0
649

दिवाळी व भाऊबीज निमित्त संतोषभाऊ कुरमेलवार यांच्या कडून गरजूंना मदत”दरवर्षी दिवाळी मध्ये, झरी तालुक्यातील तसेच काही जिल्हात माता भगिनींना, विधवा,निराधार,वयोवृध्दाना साड्या, फराळ जिवनाश्यक वस्तु,ब्लाॅकेटी तसेच आजारी रुग्णाना आर्थिक मदत करणारे सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा नाभिक टायगर सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष भाऊ गोरगरिबांना मदत करून गरीब लोकांना सहकार्य करून त्यांचे आनंद द्विगुणित करतात.लक्ष्मीपुजनच्या दिवशी 12/11/2023 रोजी मुकूटबन परिसरातील 200 महिलांना लाभ मिळाला असून या पुढे सुध्दा वाटप करण्यात येणार आहे.या कार्यात नाभिक टायगर सेना मदत कक्षात मदत करणारे त्याचे दाते, मित्र परिवार भरपूर आहे. या सर्वाचे सहकार्याने ते कायम मदत करतात. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्यांचा चाहता वर्ग असल्याने कायम ते लोकांना मदत करित असतात.त्याची ओळख हि लाॅकडाऊन काळात धाऊन येणारा समाजसेवक संतोषभाऊ अशी झाली. ते यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी तालुका झरी जामणी या तालुक्यातील मुकूटबन मध्ये राहत असून आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही सुध्दा यांची कार्यकरण्याची कार्यशैली, व प्रेमळ स्वभाव या मुळे त्याचे कडूंन कुणी नाराज होऊन जात नाही हे विशेष. त्याची प्रेरणा घेऊन प्रत्येक समाजसेवकानी गोरगरिबांना मदत करावी हिच सदिच्छा “संतोषभाऊ कुरमेलवार यांचे कार्याला मंनभरून शुभेच्छा आणखी असेच भरपूर समाजकार्य करावे हिच मनोकामना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here