पत्रकार संघाच्या गेवराई शहराध्यक्षपदी कैलास हादगुले यांची निवड

0
66

गेवराई (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व संतोष मानूरकर यांच्या आदेशाने विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या गेवराई पञकार संघाच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार कैलास हादगुले यांची निवड करण्यात आली.
कैलास हादगुले हे गेवराई शहरातील ज्येष्ठ व धडाकेबाज पत्रकार आहेत.ते जवळपास २५ वर्षांपासून गेवराई शहरात पञकार म्हणून काम करत आहे.त्यांचा गेवराई शहर व परिसरात राजकीय,शासकीय,कार्यालयीन कामकाज,शैक्षणिक व सामाजिक क्षेञात मोठा अनुभव आहे.या सर्व कार्याची दखल घेऊन विभागीय उपाध्यक्ष संपादक सुनिल पोपळे यांच्या उपस्थितीत गेवराई पञकार संघाच्या शहराध्यक्षपदी म्हणून बिनविरोध जेष्ठ पत्रकार कैलास हादगुले यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचा निश्चितच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला फायदा होणार असून,ही निवड विजयादशमीच्या रोजी करण्यात आली आहे.या निवडीने सर्व क्षेत्रातून कैलास हादगुले यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून यावेळी पञकार संघाचे तालुकाध्यक्ष अंकुश आतकरे,तालुका सचिव तुळशीराम वाघमारे,उपाध्यक्ष भागवत देशपांडे,अनिल अंगुडे,सुदर्शन देशपांडे,सचिन नाटकर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here