गेवराई तालुक्यातील धोंडराई शिवारातील सर्वे नंबर ४५२ मध्ये गणपत लक्ष्मण साखरे यांच्या शेतात कपाशी पिकामध्ये असलेल्या लाखो रुपये किमतीची गांजांची झाडे जप्त केली आहेत.
गेवराई पोलीसांना मिळाल्यानंतर गेवराई पोलीसांनी शेतात छापा मारत गांजाची एकुण ४६ झाडे ताब्यात घेत कारवाई केली आहे.
गेवराई ( वार्ताहार ) तालुक्यातील धोंडराई परिसरात कपाशीच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याची माहिती पोलिस उप अधिक्षक यांना मिळाली होती तसेच याठिकाणी त्यांनी आपल्या पथकासोबत छापा मारला असता अंदाजे दिड ते दोन क्विटल गांजाची झाले सापडली असल्याची माहिती असुन सात ते आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, धोंडराई परिसरात गणपत साखरे यांनी आपल्या शेतात कपाशीच्या पिका अंतर्गत गांज्याची झाडे लावली होती तसेच पोलिस उप अधिक्षक यांना गूप्त बातमी दारामार्फत ही माहिती मिळाली व सदर ठिकाणी छापा मारला असता दिड ते दोन क्विटल गांजाची झाडे लागवड असल्याचे दिसुन आले सदर ठिकाणाहून वरील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच ही कार्यवाई पोलिस अधिक्षक नंदकूमार ठाकूर ,अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर , पोलीस हवालदार रामनाथ उगलमुगले, दत्ताउबाळे, राऊत, भिसे,जावळे,शेखर हिंगावार,चालक खैय्युम खान यांनी केलीये.याबाबत गेवराई पोलीसांनी मुद्दे मालाचे मोजमाप करत आहेत या संबंधित लवकरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करु असे सांगितले..