गेवराई (शुभम घोडके) उन्हाच्या झळा व वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे. मराठा आरक्षणाच्या महासभेसाठी गेलेल्या तरुणांचा परत येत असताना उष्माघाताचा पहिला बळी गेला. अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथुन परत येत असलेल्या युवकास अचानक चक्कर आली. उलट्या झाल्या उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
गेवराई येथील युवा उद्योजक विलास पवार (वय ३४) असे या युवकाचे नाव आहे. वाढते तापमान व उन्हामुळे पवार यांना उष्माघाताने चक्कर आली उपस्थितांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. येथील तापमानाचा पारा सातत्याने ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. विलास पवार यांचा मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.त्यांच्यावर अंत्यसंस्कार चिंतेश्वर स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे