नवरात्र नवदुर्गा पर्व निमित्त
!!! या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेन संस्थिता ! नमस्ते नमस्ते नमस्ते नमो नमः!!!
आज नवरात्र दिनविशेष निमित्ताने आगळ्यावेगळ्या क्षेत्रात स्वतः ची ओळख निर्माण करनाळऱ्या स्त्रियांबद्दल….
ह भ प अर्चनाताई हेमंत नेरकर वय 41 पिंपरी चिंचवड रहिवासी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या चार भावंडे आई वडील असा परिवार, साधारण परिस्थिती असुनही वडिलांनी शिक्षण दिले डिग्री पुर्ण केले. शिवजन्मभुमी जुन्नर तालुक्यातील नारायण गावं येथील श्री हेमंत वामनराव नेरकर यांच्याशी लग्न समारंभ थाटामाटात पार पडला. मितभाषी, अबोल, खूप कमी बोलणारी, अर्चना चंद्रकांत आपके नावाने ओळखली जाणारी अर्चना आता सौ. अर्चना हेमंत नेरकर झाली.
संसार थाटामाटात चालवलेला, दोन मुलांना जन्म दिला. वाचनाची आवड असल्याने अनेक पुस्तकांचे वाचन झाले भरपूर ज्ञान मिळाले. शिक्षणाची आवड स्वस्त बसुदेत नव्हती घरी लहान मुलांना क्लासेस च्या माध्यमातून शिक्षण दिले. लहानपणापासून नास्तिकता बाळगून असलेल्या मनात कधी आस्था निर्माण झाली कळले च नाही. हा सर्व प्रकार पतीला लक्षात आला. तेव्हा त्यांनाही गुरु च स्थान घेऊन मार्ग निवडण्याचा सल्ला दिला अनेक पुस्तकांचे व ग्रंथांचे वाचन झाले.
विशेष म्हणजे पुढील शिक्षणासाठी पतीने प्रवृत्त केले आणि M A चे दोन पार्ट पुर्ण झाले दोन मुलांनाही सांभाळून पतीच्या बिझनेस संदर्भात सोबत राहुन सुत्रसंचलन करण्यात पारंगत झाले. प्रत्येक गोष्टीत वेगळे स्थान मिळाले. पतीने सांगितले तुच तुझ्या जिवनाची शिल्पकार हो तुला काय करायचे ते तु ठरव. नारायण गावं ला ग्रामदैवत मुलांई मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे पारायण करण्याचा योग आला.
तेथुन निवेदनाद्वारे प्रवचन करण्यास सुरुवात झाली…. अनेक ठिकाणी प्रवचन झाले, अभ्यास वाढतच गेला.आई वडिलांच्या पुण्याईने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कृपेने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे प्रथम किर्तनाचा योग आला.
ओझर विघ्नेश्वर मंदिर,
(अष्टविनायक) गिरगाव, मुंबई संत सेना न्हावी महाराज ( 350 वर्षे जुनें) आळंदी सिहाबेट, भागेश्वर मंदिर, नारायण गावं असे अनेक ठिकाणी किर्तन चा योग आला श्रींच्या कृपेने गोरगरीब असतील तर निःशुल्क सेवा करीत पुढील कारकीर्द चालूं आहे…
संकलन;
सौ. उज्वला गुरसुडकर
मो. नं. 9764887662