गेवराई (प्रतिनिधी)सिरसाळा येथील प्रा.डाॅ. उषा माने यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, गृहविज्ञान व समाज प्रबोधन या क्षेत्रातील विविध कार्याची दखल घेऊन महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक/प्राध्यापक परिषद महाराष्ट्र राज्य यांनी नुकतीच त्यांची आर्दश शिक्षका पुरस्कारासाठी निवड केली आहे.
शेतकरी कुटुंबातील प्रा. डाॅ. उषा माने यांच्या कार्याची दखल घेत सन २०२३-२४ या वर्षी च्या राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा पुरस्कार त्यांना दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री मा. ना. दिपक केसरकर, मा. खा. धैर्यशिल माने, मा. खा. ब्रिगेडियर सुधीर सावंत, म. ज्यो. फुले शिक्षक/परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, उपाध्यक्ष प्रा.डाॅ. सखाराम वाघमारे, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र वर्ताळकर, महासचिव मुरलीधर गोडबोले, राम येडते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार असुन, सर्व स्थरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.