“एक सच्चा कलावंत श्री विठ्ठलराव वादे”

0
665

गेवराई शहरातील सांस्कृतिक वैभवात मोलाची भर टाकणाऱ्या पैकी श्री विठ्ठलराव वादे होते दिनांक 1 ऑक्टोबरला त्यांचे दुःखद निधन झाले आम्हा कलावंतांचे आधारवड नेहमी कलेची प्रेरणा देणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असे अचानक निघून जाणे धक्कादायक होते नियतीने अखेर डाव साधला आणि बापूंना ती अनंताच्या प्रवासाला घेऊन गेली अत्यंत निष्ठावान कलावंत आयुष्यभर या न त्या माध्यमातून सातत्याने सेवा करणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे आदरणीय श्री विठ्ठलराव वादे श्री विठ्ठलराव बापू विनोदी व्यक्तिमत्व होते त्यांना अभिनयाची जाण उपजतच होती तसेच आवाजाची ही अप्रतिम देणगी त्यांना उपजतच मिळाली होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कलेच्या प्रांतात ते खरंच अष्टपैलूच होते कितीतरी वेगवेगळ्या पैलूंचे आम्ही साक्षीदार आहोत किती गुण वर्णावे ऐसा कलावंत पुन्हा खरंच होणे नाही ग्रामीण भागात असे अनेक श्रेष्ठ कलावंत आहेत पण आजपर्यंत त्यांची उच्च स्तरावर कुणीही दखल घेतली नाही हे दुर्दैव आहे कदाचित त्यांचा स्वभाव किंवा एवढी माहिती त्यांना नसते की माहितीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही पण असे अष्टपैलू अनेक कलावंत उपेक्षितच राहतात कलावंत उपेक्षितच राहतात त्यांच्यात खूप क्षमता असते कोणतीही भूमिका ते लीलया पार पाडू शकतात श्री विठ्ठलराव उर्फ बापू मला जशी समजले उमजले त्यांच्या सहवासात खूप काही शिकायला मिळालं तसं मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे गेवराई शहरात तीन हनुमानाची मंदिरे आहेत या तीनही ठिकाणी दरवर्षी हनुमान जयंतीला तीन अंकी नाटके बसवली जात मेन रोड मोंढा भागात असलेल्या हनुमान मंदिरात ही परंपरा खूप जुनी आहे होती तिथे गेवराईचे संगीत सूर्य आदरणीय काय हमीद मिया पाटील यांनी नाटकाची परंपरा सुरू केली असे सांगितले जाते तत्कालीन परिस्थितीत श्री हमीद पाटील एक दिग्गज कालावंत होते सह्याद्री सांगे कथा शंभूची या नाटकात त्यांनी स्वतः छत्रपती शिवरायांची भूमिका यशस्वीपणे केली होती भाषेवर संवाद फेकीवर या कलावंताचे प्रभुत्व होते श्री हमीद पाटील संगीतज्ञ होते त्यांना संगीतातील रागांची ओळख होती वृद्धत्वामध्ये सुद्धा या अवलियाची बोटे हार्मोनियम वर किती वेगाने फिरायची हे आम्ही पाहिले आहे श्री हमीद पाटील सायंकाळची नमाज अदा केल्यानंतर हनुमान मंदिरात भजनाला यायचे त्यावेळी त्यांनी गायलेले अभंग चाल अप्रतिम असायच्या ते एवढे संगीत वेडे होते त्यांच्या घरी शारदाविना होती त्या विनेवरती रात्री कितीतरी वेळ रियाज करायचे तेव्हा त्यांना तत्कालीन सुप्रसिद्ध संगीतकारांनी चित्रपटांना संगीत देण्यासाठी बोलावले होते पण पाटील साहेब गेले नाहीत त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी आपली कला कौशल्य पणाला लावले त्यांनी हनुमान जयंतीला नाटके बसवली त्यातून अनेक नवनवीन कलाकार तयार केले त्यांनी दिग्दर्शित केलेली अनेक संगीत नाटकेही त्यांनी बसवली आणि अशा दिग्गज संगीतकार संगीत सूर्य श्री हमीद पाटील यांनी श्री शाहीर राम मुळे श्री विठ्ठल राव वादे असे अष्टपैलू हिरे घडवली श्री बापूंना भजनाचा खूप छंद भजनात ते सर्व प्रकार गायचे अभंग गवळणी एकतारीच्या अभंग अशा वेगवेगळ्या प्रकारात ते निष्णात होते गवळणी गाताना त्यांचा आवाज टिपेला पोहोचायचा त्यांच्या गोड गळ्यातून आलेली गवळण टाळकरी व भजनातील इतर सहकाऱ्यांना डोलवायची ते केवळ हार्मोनियमच वाजवत असे नाही तर पखवाज तबला अशी कोणतीही वाद्य ते लीलया हाताळत असत त्यांचा ठेका इतका पक्का होता की ते तोंडाने बोल वाजून एखाद्या नवीन वाजवणाऱ्याला शिकवत असत भजनाचे अंग असलेल्या बापूंना निळ्या मध्ये आल्यानंतर हिंदी गाण्यांची ओळख झाली गीतांजली मेळ्याची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला बापूंना हे थोडे अवघडच गेले गंमत म्हणजे एखाद्या हिंदी गाण्याला बापू कधी कधी भजनातला ठेका वाजवायचे तेव्हा आम्ही हसलो की त्यांच्या लक्षात यायचं आपला ठेकात चुकतोय बघ आम्ही ते गाणं पुन्हा विठ्ठल रावांना ऐकवायचं मग ते सावरून घ्यायचे वेळामध्ये नक्कल विनोद कधीच त्यांची स्क्रिप्ट नसायची मग विठ्ठलराव श्रीकृष्ण कनपुरे मामा ऍडव्होकेट सुभाष निकम यांच्यासह काय वैजनाथ दादा येवली या सर्व मंडळी कडून एकत्र बसल्यानंतर अफलातून कल्पना निघायच्या ठरलं की मग लगेच पात्र वाटप मी हे करतो मी हे करतो असं ठरलं की उर्वरित पात्र विठ्ठलराव आणि वैजनाथ दादा हे अगदी ठरलेला असायचं रंगमंचावर आमच्यासारख्या नवदिताला सहज अड्जस्ट करायचे विठ्ठल रावांना स्टेज करे जेवढे होते की ते हजर जबाबी होते हनुमान जयंतीच्या बऱ्याच नाटकात मी त्यांच्यासोबत दिग्दर्शनात बरीच नाटके केली तेव्हा स्त्रीपात्र करणे खरंच कठीण होतं पण विठ्ठल राव एखाद्या गोऱ्या गोमट्या दिसणाऱ्या कलाकाराला तयार करायचे डाकू राणी नावाचं नाटक एकदा हनुमान जयंतीला बसवलं त्यातलं मुख्य पात्र स्त्रीपात्र होतं तेच त्रिपात्र मी विठ्ठलाच्या प्रेरणेने यशस्वी केलं किती किती आठवणी लिहाव्यात आदरणीय श्री विठ्ठलराव वादे म्हणजे गेवराईच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व होते आधारवड होते आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या सहवासात व्यतीत केलेला काळ आठवणींच्या रूपात सदैव ठेवत राहील देण्यात नाटकात त्यांनी खूप भूमिका निभावल्या रसिकांना त्यांनी खूप हसवलं पण नियती इतकी आरसी कितीने अशा हरहुन्नरी कलासक्त कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या निष्ठावान रंगकर्मीला आपल्यातून हिरावून नेलं एका गणामध्ये शब्द आहेत नम्र कलेचे सार्थक व्हावे खरंच रसिकाकडून आदरणीय श्री विठ्ठल राव यांच्या बाबतीत सार्थकता व्हावी एवढीच अपेक्षा अशा या दिग्गज जाणकार कलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या खाऱ्या कलावंताला अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखक-
प्रकाश भुते, गेवराई.
9881446457

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here