गेवराई शहरातील जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात:- अनिल बोर्डे

0
100

गेवराई प्रतिनिधी

गेवराई शहरातील जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ गेवराई यांच्या वतीने ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख व बीड जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे माजी सदस्य अनिल बोर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार श्री विशाल जी भोसले मुख्याधिकारी नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले व त्याची प्रत मा. जिल्हाधिकारी बीड व मा. तहसीलदार गेवराई यांना देण्यात आली.
भारताच्या संविधाना तील राज्य धोरणाची निदेशक तत्त्वावरील अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकाचे स्थान विचारात घेता वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा असे शासनाचे परिपत्रक काढले असून त्याचे अवलोकन करून ज्येष्ठ नागरिकाच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अशा मागण्या पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.
गेवराई शहरातील ज्येष्ठ नागरिकांना व अपंग व्यक्तींना आपल्या कार्यालया मार्फत एक गाळा किंवा जागा उपलब्ध करून देणे बाबत आपणास दिनांक 27/4/23 आणि3/8/23 रोजी प्रत्यक्ष चर्चा केली असता आपल्या आपली मागणी योग्य असून ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रत्यक्ष सांगितले होते परंतु त्यावर अद्याप निर्णय झाला नव्हता परंतु आज यावर सकारात्मक चर्चा होऊन लवकरात लवकर आपल्या मागण्या मान्य करण्यात येईल असे सर्व समक्ष सांगितले सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मुख्याधिकारी यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

गेवराई शहराचा आकार सर्व बाजूने वाढत आहे कोल्हे रोड व शास्त्री चौक ताकडगाव रोड येथे बसण्याची व्यवस्था उपलब्ध नाही त्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येईल व आपणास बेंच व जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे मान्य केले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे गार्डन असणे आवश्यक आहे त्या संदर्भात योग्य ती कारवाई व्हावी तसेच सध्या उपलब्ध असणारे गार्डन ज्येष्ठ नागरिकाला उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले
वरील मुद्द्याचा विचार विनिमय करून त्याची दखल घेण्यात आली. टप्प्याटप्पाने सर्व मागण्या मान्य करण्याचे ठरले ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सहकार्य मिळाले.
या निवेदनावर मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख अनिल बोर्डे राजेंद्र सुतार विश्वास चपळगावकर इंजिनीयर अवधूत एन एस. कचरू उढाण श्रीरंग दळवी किसन शिंदे निवृत्ती घाटे रामेश्वर पोहनेरकर थळकर इत्यादी निवेदन देताना हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here