कुटे ग्रुपच्या श्रमदानातून पालटले शहराचे रुप : सार्वजनिक स्वच्छतेतही ‘तिरुमला पॅटर्न’; शहराच्या विविध भागात अभियान

0
348

बीड: प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कुटे ग्रुपच्या वतीने बीड शहर व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानातही तिरुमला पॅटर्नचे वैशिष्ट्य जपत अतिशय नियोजनबद्धरित्या स्वच्छता करण्यात आली. शहरात 30 हून अधिक टीमच्या मदतीने हे अभियान राबविण्यात आले बीड शहराचे रुपच पालटल्याचे दिसले.
बीड येथुन देश-विदेशात नावारुपास आलेल्या कुटे ग्रुपने आपले वेगळेपण जपले आहे. व्यवसायात गरुडझेप घेत असलेल्या या ग्रुपने सामाजिक भानही जपले आहे. बीडसह राज्यभरात सातत्याने विविध सामाजिक उपक्रम ग्रुपच्या माध्यमातून राबवले जातात. उद्या दि.2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आहे. यानिमित्त कुटे ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कुटे, एमडी सौ.अर्चनाताई सुरेश कुटे, आर्यन कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.1 ऑक्टोबर रोजी कुटे ग्रुपच्या वतीने बीड शहराच्या बसस्थानकापासून ते बालेपीर, बार्शी नाका, खंडेश्वरी मंदिर, जालना रोड, धोंडीपुरा, सुभाष रोड, मोंढा, हिरालाल चौक, माळीवेस, बशीरगंज, कारंजा, शासकीय रुग्णालय,बालपीर,शहेशाहवाली दर्गा केएसके कॉलेज रोड, तुळजाई चौक, राजीव गांधी चौक, अंबीका चौक, कॅनॉल रोड, शासकीय आयटीआय, भक्ती कन्स्क्शन यासह विविध भागात तीस टीम पाठवण्यात आल्या होत्या. हाती झाडू, टोपले घेवून हे स्वयंसेवक भल्या सकाळीच रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या मदतीला कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टरचीही व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकांनी केलेल्या स्वच्छतेमुळे शहराच्या विविध भागाचे रुपच पालटले आहे. शहराच्या विविध भागात अतिशय नियोजनबद्धरित्या राबविण्यात आलेल्या या मोहिमेतून कुटे ग्रुपचा पॅटर्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

हाती झाडु अन्‌‍ टोपले!
कुटे ग्रुपच्या माध्यमातून शेकडो स्वयंसेवक रविवारी सकाळीच रस्त्यावर उतरले. हातात झाडू अन्‌‍ टोपले, तोंडाला मास्क, हॅन्डग्लोव्हज व विशिष्ट ड्रेसकोड असलेले हे स्वच्छतादूत सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा विषय ठरले. या स्वच्छतादूतांनी वेगवेगळ्या परिसरात दाखल होत थेट स्वच्छतामोहीमेला सुरुवात केल्याने दुपारपर्यंत बहुतांश भागातील कचरा थेट शहराबाहेर पोहचला होता.

या मातीशी नाते
कुटे ग्रुप या मातीतून निर्माण झाला आहे त्यामुळे बीडकरांचे योगदान आमच्यासाठी मोठे आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुटे ग्रुपच्या वतीने रविवारी संपूर्ण बीड शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
अर्चना सुरेश कुटे,(मॅनेजिंग डायरेक्टर कुटे ग्रुप)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here