किल्लेधारुर/प्रतिनिधी
कासारी पाटी जवळच असलेल्या टोलनाक्या जवळ एसटी बसने दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे . यात दुचाकीस्वार मयत झाला असून दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,कळंब येथुन माजलगाव कडे जाणाऱ्या बस क्रमांक एमएच १४ बीटी २५३४ किल्लेधारुर येथुन मैंदवाडीकडे जात असलेल्या दुचाकी स्वाराला समोरासमोर धडक दिली.धडक इतकी भीषण होती की,दुचाकी क्रमांक एम एच ४४ जे ९२०७ व दुचाकीस्वार थेट बसच्या खाली मधोमध अडकले.यात दुचाकीचा चालक चंद्रभान भगवान मैंद रा.मैंदवाडी ता.किल्ले धारुर वय ५२ हे जागीच ठार झाले.तर दुचाकीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आहेत.किल्लेधारुर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस उप निरिक्षक श्री. गोविंद बास्टे हे पुढील तपास करत आहेत.दरम्यान या घटनेने सर्वत्र खळबळ माजली असुन मैंदवाडी गावावर शोककळा पसरली आहे.