ग्रामीण उद्देश न्यूज पेपर श्री गणेश मंडळ तर्फे अनेक प्रतिनिधी व इतर मान्यवरांना गौरव पुरस्कार प्रदान

0
301

नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर

ग्रामीण उद्देश न्यूज पेपर गणेश मंडळ भेंडे गावं यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना गौरव सन्मान पुरस्कार करण्यात येतो. याच अनुषंगाने दिनांक 26- 9 -2023 रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड शाखा अभियंता निलेश बोथीकर साहेब होते. तर प्रमुख पाहुणे गावचे सरपंच राजेश शेषेराव उदगीरे, झुंजार क्रांती सेना संस्थापक सचिव गजानन चावरे, माजी सरपंच विठ्ठलराव कदम, लिंबापुरे साहेब, शालेय समिती अध्यक्ष विशाल भाऊ कदम, हे होते. ग्रामीण उद्देश न्यूज पेपर चे मुख्य संपादक सौ.कावेरी ताई मारुती श्रीमंगले. मार्गदर्शक म्हणून कार्यक्रमाला लाभलेले भेंडे गावं चे ग्रामसेवक मॅडम जाधव, प्रथम नागरिक माजी सरपंच शंकरराव लिंबोटकर, पोलीस पाटील खुशाल कदम, शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष , अविनाश कांबळे ग्रामीण उद्देशचे कार्यकारी संपादक. गंगाधर तेलंग, शेवडी चे लोकमत पत्रकार प्रभू फुल झळके, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते ग्रामीण उद्देशच्या सर्व पत्रकार व इतर मान्यवरांना त्यांचे कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले. चंद्रकांत लक्ष्मण श्रीमंगले, कांचन कांबळे. जावेद शेख. जाफर शेख. माधव भोसीकर महेश विद्यालय शिक्षक.. सौ.उज्वला गुरसुरकर, श्याम वाघमारे, उत्तम डोई बळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक. राम श्रीमंगले, लहू श्रीमंगले, जिल्हा परिषद शिक्षिका भारतीताई मोहनराव राठोड, व अर्चना रामराव ठोळे, नीलावती कपाळे, आशा वर्कर, इत्यादी जणांना ग्रामीण उद्देश पेपर गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत पुरस्कार देण्यात आला व कन्या दिनानिमित्ताने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यांना सुद्धा सन्मानपत्र व वही देऊन गौरविण्यात आले. अशाप्रकारेगावातील ज्येष्ठ नागरिक राम उदगीरे, विश्वनाथ उदगीरे, नारायण कपाळे, शिव शंकर कदम, तिरुपती कोल्हे, निर्मलाबाई कदम, पूजा श्रीमंगले, दत्ता तेलंग, अंजन भाई कदम, इत्यादी सहभागी होते. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाहीर एडके यांनी मानले त्या वेळी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here