तलवाडा येथील कल्लोळ तिर्थात कोणीही श्री गणेश मुर्तीच विसर्जन करू नये – बापू गाडेकर

0
136

तलवाडा ( प्रतिनिधी ) :- गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे पुरातनकालीन श्रीक्षेत्र त्वरितादेवी देवस्थान व श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर असून याठिकाणी यात्रा परिसरात जुन्या काळातील भव्यदिव्य असे ऐतिहासिक कल्लोळ तीर्थ ( तीर्थ कुंड ) आहे. हे कल्लोळ तीर्थ भाविक – भक्तांच्या श्रध्देचे ठिकाण आहे. देवीच्या दर्शनासाठी दुरवरून येणारे भाविक-भक्त कल्लोळ तीर्थ याठिकाणी देखील नतमस्तक होतात. कल्लोळ तिर्थातील पाणी डोळ्याला लावून ते तीर्थ म्हणून तोंडात सुध्दा घेतात. तसेच या पाण्याने अंघोळ देखील करतात. अशाप्रकारे या कल्लोळ तीर्थाचे पुरातन काळापासून महत्त्व आहे. त्यामुळे तलवाडा व परिसरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व घरगुती गणपती बसवणारे लोकांनी या कल्लोळ तीर्थात श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करू नये असे आवाहन पत्रकार बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. ऐतिहासिक व धार्मिक ठिकाण असलेल्या कल्लोळ तिर्थातील पाण्यात कोणीही श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करू नये याची दक्षता ग्रामपंचायत तलवाडा व पोलीस प्रशासन तसेच सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी घ्यावी असे मत बापू गाडेकर यांनी तलवाडा पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत व्यक्त केले होते. जर एखाद्याने याठिकाणी श्री गणेश मुर्तीचे विसर्जन केले तर ती एकप्रकारे धार्मिक विटंबना होऊन भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे कल्लोळ तीर्थात कोणीही गणपती बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करू नये यासाठी पोलिस प्रशासनाने हि बाब गांभीर्याने विचारात घेऊन विसर्जनाच्या दिवशी कल्लोळ तीर्थ याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करावा अशी मागणी देखील पत्रकार बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here