गेवराई (शुभम घोडके) शहरातील चिंतेश्वर मंदिरात समोर असलेल्या खंडोबा मंदिर परिसरात रविवार (ता. 24) सकाळी सातच्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.मृत अवस्थेत असलेला तरुण पोलिसांनी ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. मृताचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असून ओळखीबाबत माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन गेवराई पोलिसांनी केले आहे.