आष्टी प्रतिनिधी
बीड जिल्हा,आष्टी तालुक्यातील मौजे हनुमंतगाव चिखली येथील स्वातंत्र्यवीर वि. दा.सावरकर विद्यालयात कवी युवराज वायभासे त्यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी,बालकवी त्रिंबक बापूजी ठोंबरे,रानकवी ना.धों.महानोर यांच्या स्मरणार्थ बाल कुमार कवी संमेलन शनिवार दि.16 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे.या कवी संमेलनात हरीश हातवटे,इंद्रकुमार झांजे,अनिल बहिरट,संतोष दाणी,राजेंद्र लाड,नागेश शेलार,संगीता होळकर.औटे अशोक उढाणे,नजमा शेख हे सहभागी होणार आहेत.दिनांक 16 सप्टेंबर रोजी प्रख्यात कवी ना.धों.महानोर यांचा जन्मदिवस आहे.या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य,महादेव नाना शिंदे,उद्धव बापू दरेकर हे उपस्थित राहणार आहेत.कवी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सायंबर साहेब,शेख,बळे,पडोळे,भोसले,देवमुंडे, शिंदे,खुणे,विधाते हे शिक्षक वृंद,कोकणे, आवारे,तांबे,मांडगे,काळे शिक्षकेतर कर्मचारी वृंद,तसेच जिल्हा परिषद मुख्याध्यापक मुबारका आतार साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत.असे बाल कुमार कविसंमेलनाचे संयोजक कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी सांगितले.