सळईच्या ट्रकला आयशर  धडकून चालक ठार

0
293

गेवराई | प्रतिनिधी
गेवराई बायपासवरील दुर्देवी घटनाःमृत चालक हा कोळीबोडखा येथील रहिवासी  नादुरुस्त अवस्थेत उभ्या असणाऱ्या सळईच्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या  आयशरची जोरदार धडक बसल्याने या दुर्घटनेत आयशर  चालकाचा जागीच मृत्यू  झाल्याची दुर्देवी  दुर्घटना औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई जि.बीड बायपासवरील इंडियन आँईल पेट्रोल पंपासमोर सोमवारी ता.२५ मध्यराञी दोन वाजेच्या सुमारास घडली.हमीद बन्नूभाई  पटेल वय (३५) रा.कोळी बोडखा ता.पैठण असे  मृत झालेल्या चालकाचे नाव आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, जालन्याहून लोखंडी सळई घेऊन बीडकडे जाणाऱ्या  ट्रक क्रमांक एमएच १४ बीजे०८५२ हा गेवराई बायपास जवळ येताच या ट्रकचे अचानक एक्सेल तुटल्याने चालकाने या  ट्रकला थांबून  रोडच्या बाजूला नादुरुस्त अवस्थेत उभा केला होता .दरम्यान राञी दोन वाजेच्या दरम्यान आयशर क्रमांक एमएच २० डीई ४४३४  हा औरंगाबादहून गूडवेज कंपनीचे नविन टायर  बीड मार्गे कर्नाटकडे  घेऊन जात असतांना दरम्यान गेवराई बायपासवर येताच चालकाला अंधारात समोरचा नादुस्त सळईचा उभा असलेला ट्रक दिसला नसल्याने आयशर   पाठीमागून  येऊन सरळ जोरात  ट्रकला  धडकताच मोठा आवाज झाला त्यामुळे आसपासच्या   नागरिकांनी हा आवाज ऐकून  घटनास्थळी धाव घेत गेवराई पोलिसांना या दुर्घटनेची माहिती दिली.

 पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी दाखल होऊन अपघातग्रस्त आयशर चालकास नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला  असता परंतु  आयशरच्या समोरील कँबीनध्ये  लोखंडी सळई  घुसल्याने त्याचा पूर्णपणे चुराडा होऊन ती फाटली गेल्याने चालक हमीद पटेल  हा स्टेअरींगमध्ये अडकून होता त्यामुळे पोलिसांनी  आयआरबीच्या   क्रेनला पाचरण करुन त्याच्या  सहाय्याने  फाटलेल्या केबीनच्या पञ्याला  सरळ करुन  गंभीर जखमी अवस्थेत आडकून,पडलेल्या चालकाला तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर  बाहेर काढून गेवराईच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता  यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून मृत घोषित केले. मयत चालक हमीद पटेल याच्या पश्चात आईवडील दोन भाऊ पत्नी एक लहान मुलगा मुलगी असा परिवार या घटनेबद्दल सर्वञ हळहव व्यक्त करण्यात येत आहे या  दुर्घटनेची नोंद गेवराई पोलिस ठाण्यात करण्यात येऊन ट्रक चालकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here