घाटात कंटेनर पलटी;दोन युवक जागीच ठार

0
254

पाटोदा -तालुक्यातील बीड -अहमदनगर महामार्गावरील महेन्द्रवाडीच्या घाटात रेल्वेचे सामान घेऊन जाणारी ट्रक कॉर्नर वर टर्न बसला नसल्यामुळे शनिवारी रात्री आठच्या सुमारास पलटी झाल्यामुळे ट्रकमधील निखील दहिफळे,वय 18 वर्षे रा.खडकवाडी.ता.पाटोदा.व.नानासाहेब सानप वय 21वर्षे खडकवाडी .ता.पाटोदा यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेने खडकवाडी येथे शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलिस ठाण्याचे पीएसआय पतंगे ,पोलिस कर्मचारी संभाजी सोळंके ,काकडे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली होती.

पाटोदा पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या महेंन्द्रवाडीच्या घाटात दौन्ड कडून येणारा ट्रक एम एच 23 डब्लू 2683 हा आला असता ट्रक चालकाला कॉर्नरचा अंदाज न आल्यामुळे सदरिल ट्रक खोल दरीत कोसळला या ट्रक मधील निखील दहिफळे व नानासाहेब सानप यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अपघात झालेला ट्रक हा सावरगाव येथील असल्याचे कळते ट्रक मधील मयत झालेले दोन्ही युवक हे अविवाहीत होते .ट्रक मधील निखील व नानासाहेब हे दोघेच असल्यामुळे व ते दोघेही मयत झाल्यामुळे नेमका ट्रक कोण चालवत होता याची अधिकृत माहिती कळू शकली नाही.या अपघाताची पाटोदा पोलिस ठाण्यात उशीरा पर्यंत नोंद दाखल झालेली नव्हती.रविवारी सकाळी देखील पाटोदा पोलीस ठाण्याचे पीएसआय पतंगे,पोलिस कर्मचारी संभाजी सोळंके,काकडे यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here