गेवराई (प्रतिनिधी) गेल्या बारा वर्षापासून अखंड सातत्याने गौरी गणपती निमित्त युवराज शिवाजीराव कळसकर यांच्या पत्नी सौ. अनिता कळसकर ह्या अनेक वर्षापासून वेगवेगळे देखावे करून समाजांचे लक्ष वेधतात समाजप्रबोधन व्हावे यासाठी प्रयत्न करतात. पुराणिक अध्यात्मिक आणि सामाजिक हलते देखावे सादर करून प्रेक्षकांचे मने जिंकली आहे.बारा वर्षाचा तप देखाव्यातून पूर्ण करणारा तरुण युवराज शिवाजीराव कळसकर ठरतोय
गेवराई शहरातील तरुण युवक असलेले युवराज शिवाजीराव कळसकर यांच्या पत्नी सौ. अनिता कळसकर यांच्या सहकार्यातून पती-पत्नीने गेल्या दोन महिन्यापासून या देखाव्याचे तयारी केली होती. सातत्याने देखावा सादर करण्याची कला अवगत असणारे हे कुटुंब या निवासस्थानी प्रेक्षकांची भाऊ गर्दी दिसत आहे. यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा चमत्कार रेडे मुखी वेद बोलीला, ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मुक्ताई भाकरी भाजताना, भिंत चालवताना होणाऱ्या हालचालीमुळे हलके देखाव्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मानून सावता नगर भागात कळस्कर यांच्या घरी महिलांची व प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली.