हसनापूर प्रतिनिधी अल्तमस पटेल,अफ्फान पटेल,बाबा शेख यांनी हसनापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये एबीएम पॉलीमर्स हा प्रकल्प सुरू केला,याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे.ग्रामीण भागामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करणे धाडसाचे काम आहे.परंतु त्यांनी आपल्या स्वतःच्या जागेत उद्योग व्यवसाय सुरू करून एक आदर्श निर्माण केला आहे.याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो.अल्तमस पटेल यांच्या परिवाराशी आमचे पूर्वीपासून स्नेहाचे,जिव्हाळ्याचे संबंध आहेत.ईदला निमंत्रण मिळताच शुभेच्छा देण्यासाठी आम्ही त्यांच्या अनेक वेळा घरी गेलो.या उद्योग निर्मितीच्या निमित्ताने आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू.असे नामदार डॉ.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.रविवार दि.15 सप्टेंबर रोजी हसनापूर लोणी प्रवरा येथील एबीएम पॉलिमर्सच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उद्योजक या नात्याने अल्तमस पटेल, अफ्फान पटेल,बाबा शेख यांनी मान्यवरांचा सत्कार केला.फीत कापून रीतसर उद्घाटन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,तेजस एस. मुथा, व्हॉइस प्रेसिडेंट प्राईड पर्पल ग्रुप,पुणे त्यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी नंदू शेठ राठी, हसनापूरचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,इब्राहिम पटेल,अन्वर पटेल,साबिर पटेल समीर पटेल,संजय जगताप,नबाजी जगताप, पंचक्रोशीतील अनेक मान्यवर यांची उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लाभली.निसार पटेल यांनी प्रास्ताविक केले.कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी सूत्रसंचालन केले.