मानवत / प्रतिनिधी.
मानवत शहरातील स्वामी विवेकानंद चौकात सोमवारी आठवडी बाजार भरत असतो तसेच मानवत शहराशी तालुक्यातील एकूण ५४ गावाचा तालुक्याशी दररोज संपर्क येत असतो सोमवारी आठवडी बाजातील गर्दीचा फायदा घेत भुरट्या चोराचा मोठया प्रमाणात सुळसुळाट वाढला असून मोबाईल चोरी, रक्कम चोरी या सारखे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे या ठिकाणी आठवडी बाजारचा दिवशी एकदापोलीस कर्मचारी गस्त असावी अशी मागणी नागरिकांतुन केली जात आहे.