गेवराईत पुन्हा वाळूमुळे एकाचा बळी !

0
1382

हायवाने गेवराईत तरुणास चिरडिले

गेवराई प्रशासन आणखी किती जणाचे बळी घेणार – धम्मपाल कांडेकर

गेवराई, (प्रतिनिधी):- गेवराईतील अवैध वाळू काही केल्या पुर्णता बंद करण्यात महसुल व पोलीस प्रशासनाला यश येत नसल्याने सर्वञ सध्या खुलेआम वाळू उपसा भर पावसाळ्यात सुरु आहे.शनिवारी राञी बीडकडे वाळू उपसा करुन जाणा-या हायवाने गेवराईतील तरुणास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.रविवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात पोलीस पंचनामा करण्यासाठी आले असता तरुणाच्या नातेवाईक व मिञांनी अगोदर वाळूचा हायवा ठाण्यात लावून संबंधितांवर गुन्हा दाखल करा,त्यानंतर आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ असा पाविञा घेतला.दरम्यान गेवराई तालुक्यातील खुलेआम सुरु असलेल्या अवैध वाळू उपस्यापायी पुन्हा एक जणाचा बळी गेला आसल्याचे रुग्णालय परिसरात बोलले जात असुन आता बीडच्या जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ व पोलीस अधीक्षक यांनीच जातीने लक्ष घालून गेवराईतील अवैध वाळू उपसा बंद करावा अशी मागणी देखील नागरिकांकडून येते होत होती.दरम्यान याबाबत महसुल मंञी यांना निवेदन देऊन तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा पॅन्थर रिपाईचे बीड जिल्हाध्यक्ष तथा म.प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी या घटने बाबत दिला आहे.
गेवराई तालुका म्हटलं की गोदावरी नदी पाञातून खुलेआम अवैध वाळू उपसा करण्याचे मुख्य ठिकाण म्हणून संपूर्ण मराठवाड्यात परिचित झाले आहे.येथील गोदावरी नदीपाञ वाळू माफियांना एक प्रकारे सोन्याची खाण होत असुन तर दुसरीकडे शासनाचा कोट्यावधी रुपायाचा महसुल बुढवण्याचे व दिवसा ढवळ्या शासनाला चुना लावण्याचे ठिकाण म्हणून देखील ओळखले जात आहे.गेवराई तालुक्यात हा सर्व प्रकार महसुल व पोलीस प्रशासनातील लोकांच्या अर्थपुर्ण व्यवहारारामुळेच होत आसल्याचे गोदावरी नदी काठच्या गावातील नागरिकांकडून बोलले जात आहे.दरम्यान मागिल दिड दोन वर्षात अवैध वाळू उपसा करणा-या विविध वाहाने व विविध घटनेत जवळपास १५ ते २० नाहक नागरिकांचा यामधे बळी गेला असुन यामधे शाळकरी मुला मुलींचा देखील समावेश आहे.गेवराई तालुक्यात खुलेआम अवैध वाळू उपसा करण्याचे रामायण दररोज घडत असताना महसुल व पोलीस प्रशासनातील गेवराईतील कोणत्याही आधिकारी कर्मचाऱ्यांना कायमचा अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी आजवर यश येत नसल्याने तालुक्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त करुन आता बोलले जात आहे.तसेच ह्या दोन प्रशासनातील मंडळी आनखी किती जणांचा गेवराई तालुक्यातील नाहक नागरिकांचा बळी घेण्याची वाट पहात असे देखील नागरिकांकडून बोलले जात आहे.दरम्यान शनिवारी राञी गेवराई शहरातील धनगर गल्ली येथील परेश नेमाने या तरुणास अवैध वाळू उपसा करुन बीडकडे जाणा-या हायवाने बायपास रोडवर चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने गेवराई शहरात एकच खळबळ उडाली असुन महसुल व पोलीस प्रशासना बाबत तिव्र संताप व्यक्त होत आसल्याचे उपजिल्हा रुग्णालयात परेश नेमाने याचे शवविच्छेदन करताना नागरिकांकडून संताप व्यक्त करुन बोलले जात आहे.

            *चौकट*

गेवराई तालुक्यातील खुलेआम दिवसा ढवळ्या सुरु असलेला अवैध वाळू उपसा महसुल व पोलीस प्रशासनाने आता बंद न केल्यास पॅन्थर स्टाईलने महसुल व पोलीस प्रशासन विरोधात व गोदावरी नदी पाञात तिव्र अंदोलन छेडणार आसल्याचा इशारा पॅन्थर रिपाईचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मपाल कांडेकर तथा म.प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी यावेळी घडलेल्या घटने बाबत दिला असुन लवकरच महसुल मंञी यांना देखील गेवराई तालुक्यात अवैध वाळू उपस्यापायी आणखी किती जणाचे नाहक बळी घेणार याबाबत निवेदन देणार आसल्याचे देखील धम्मपाल कांडेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here