गेवराई:( शुभम घोडके) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय गेवराई येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, बालवयापासून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणिव जागृती व्हावी व त्यांच्यातील नेतृत्व गुणक्षमता विकसित व्हाव्यात यासाठी दिनांक २८ जुलै २०२३ वार शुक्रवार रोजी श्री चिंतेश्वर मंदिर सभागृह गेवराई येथे नेतृत्व गुण विकास शिबिर घेण्यात आले या शिबिराचे आयोजन उद्घाटन सत्र व बौद्धिक सत्र अश्या दोन सत्रात करण्यात आले कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती साबळे ताई,प्रमुख मार्गदर्शक तथा वक्ते म्हणून श्री अद्वैत दत्ताजी पत्की, शिबिर निरीक्षक श्रीमती सुजाताताई चिंचपूरकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मोरगावकर ताई, विद्यासभा संयोजक श्रीमती माने ताई यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन करण्यात आले इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी शिबिर गीताचे गायन केले यानंतर श्रीमती मोरगांवकर ताई यांनी प्रास्ताविकातून या नेतृत्व गुण विकास शिबिराच्या आयोजना पाठीमागील संकल्पना स्पष्ट केली, मार्गदर्शक श्री अद्वैतजी पत्की यांनी नेतृत्व गुणांचा विकास म्हणजे काय तो याच वयात विकसित करण्या पाठीमागील हेतू काय असावा व सद्यस्थितीत आपण विद्यार्थी दशेत आहोत आपण कोणत्या नेतृत्वगुणांच्या जोरावर उद्याचा राष्ट्रप्रेमी नागरिक बनू शकतो तसेच स्व-विकास साधत असताना आपण कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असताना आपल्यामधील आत्मविश्वास व चारित्र्यसंपन्नतेच्या जोरावर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहू शकतो असे सांगितले. या सत्राच्या अध्यक्षीय समारोपात श्रीमती साबळे ताई यांनी या नेतृत्व गुण विकास शिबीराच्या आयोजनाने व विदर्थ्यांच्या मेहनतीने संस्थेचे व विद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी होऊन प्रत्येक स्तरातून स्वतःचे नाव उंचावत आहेत असे सांगितले या सत्राचे सूत्रसंचालन श्रीमती जवकर ताई यांनी केले तर अमोल गोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.शिबिराच्या दुसऱ्या म्हणजे बौद्धिक सत्राच्या अध्यक्षस्थानी शालेय समन्वय समितीचे अध्यक्ष मा.श्री. प्रमोदजी कुलकर्णी सर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.श्री.डॉ. दिग्विजय शिखरे, शिबिर निरीक्षक श्रीमती चिंचपूरकर ताई,मुख्याध्यापक श्रीमती साबळे ताई, मोरगावकर ताई,विद्यासभा संयोजक माने ताई यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. बौद्धिक सत्राचे प्रास्ताविक श्रीमती माने ताई यांनी केले यानंतर बौद्धिक सत्र मोबाइल दशा की दिशा या विषयावर समजावून देत असताना मा.डॉ.दिग्विजय शिखरे यांनी मोबाईलच्या अतिवापराने होणारे दुष्परिणाम व मोबाईलच्या योग्य वापराने मिळणारे अद्यावत ज्ञान याबाबत माहिती सांगितली.शिबिराच्या निरीक्षक म्हणून लाभलेल्या स्वा. सावरकर विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती सुजाताताई चिंचपूरकर यांनी श्री चिंतेश्वर विद्यालयाने घेतलेल्या शिबिरा बाबतचे मूल्यांकन करताना समाधान व्यक्त केले. या सत्राच्या अध्यक्षीय समारोपात श्री प्रमोदजी कुलकर्णी यांनी आजच्या दोन्ही सत्रात प्रमुख मार्गदर्शक व त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थी सर्वांगीण विकास साधतील ही अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही सत्राचे मार्गदर्शक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत ही विद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकणारी बाब असल्याचे स्पष्ट केले. या सत्राचे सूत्रसंचालन श्री माळदकर सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री नाटकर सर यांनी केले यानंतर समरसता मंत्राने शिबिराची सांगता करण्यात आली.