गेवराई (प्रतिनिधी) गेवराई शहरातील तहसील कार्यालयाच्या परिसरात तहसील कार्यालयाच्या उत्तर बाजूच असलेला छोटे गेट गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे.त्यामुळे तहसील कार्यालयात येणारे सर्वसामान्य नागरिक व शालेय विद्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सर्वसामान्य नागरिक व व्यापारी यांचे होणारे कामे रखडत आहेत. परिसरातील व ग्रामीण भागातील लोकांचे काही कामे असतील तर समोरील असलेल्या मोठ्या गेट कडुन तहसील कार्यालयात प्रवेश करावा लागतो. काही लोकांचे शासकीय ऑनलाइन प्रणाली कागदपत्रे तहसील कार्यालयाच्या उत्तरेस बाजूस असलेल्या मल्टी सर्विस ऑनलाईन प्रणाली या दुकानांमध्ये अनेकांचे कामं होतात परंतु ते छोटे गेट बंद असल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मोठी गैरसोय होती उत्तरेस बाजूस असलेले छोटे गेट तात्काळ उघडण्यात यावे अशी मागणी अजय मोटे, गणेश खैरे, वैभव दाभाडे ,शुभम मोरे ,मुकेश कुलकर्णी, शेख समीर, गोविंद दाभाडे ,रमेश हातमोडे ,सचिन काळे यांच्यासह अनेकांनी केली आहे.