गेवराई प्रतिनिधी
माजलगाव शहरात मागील सात वर्षापासून सुरू असलेल्या छत्रपती मल्टीस्टेट या संस्थेने नुकतीच शाखेची जागा बदलून दि.22 जुलै रोजी नव्या जागेत स्थलांतर केले आहे.या स्थलांतर प्रसंगी नव्या जागेत प्रवेश व फीत कापण्याच्या कार्यक्रमास माजलगाव शहराचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, मान्यवर दयानंदजी स्वामी, कचरू तात्या खळगे, श्रीहरी नाना मोरे, नवनाथ आण्णा धाईजे, विजय दादा साळवे, राजेश भाऊ मेंडके
अविनाश बनसोडे, सुरेश शेटे, प्रदीप पट्टेकर, शेख बाबा, रेखाताई अंबुरे, कोमटवार ताई,
रवींद्र कानडे, चंद्रकांत शेजुळ,
शहाजी शेजुळ, सुनील सौंदरमल यांच्यासह शेतकरी,शेतमजूर,सामाजिक,राजकीय,व्यापारी,वैद्यकीय,शैक्षणिक,बॅकींग,पत्रकारिता,विविध संस्थेचे पदाधिकारी,उपस्थित होते.यावेळी नव्या जागेत सत्यनारायण महापूजा करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे चेअरमन संतोष (नाना)भंडारी, यांच्यासह मुख्य कार्यालय टीम प्राणेश झोटे, कुणाल बनकर, वैभव कांबळे, संतोष डिकले, निलेश सावळे, प्रफुल भगत, आविनाश माळवदे, दिपक बोबडे यांच्या उपस्थितीत पूजा संपन्न झाली.यावेळी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील व्यापारी,छोटे मोठे दुकानदार, विविध संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार व अन्य बँकेचे कर्मचारी यांनी उपस्थिती लावून छत्रपती मल्टीस्टेटच्या माजलगाव शाखेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शाखेचे स्थलांतर व सर्व कार्यक्रमाचे नियोजन स्वप्निल सोनवणे व सर्व कर्मचारी यांनी केले होते. यावेळी आलेल्या मान्यवरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की छत्रपती मल्टीस्टेटची बॅकींग सेवा ही सर्वोत्कुष्ट असून भविष्यात नक्कीच या पतसंस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.हा विश्वास व्यक्त करत सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
![](https://prakashaadhar.in/wp-content/uploads/2023/07/IMG_20230724_210940-1024x991.jpg)