गेवराई प्रतिनिधी
गेवराई आगार प्रमुखांना ग्राहक पंचायत शाखा गेवराई यांच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन प्रत्यक्ष सादर करण्यात आले या प्रश्नाबाबत आगर प्रमुखाची सविस्तर चर्चा करण्यात आली खालील समस्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले
सध्या आपल्या बसस्थानकात पाण्याची बाटली नाथ जल ची किंमत (15) रुपये असताना त्याची बस स्थानकात(20) रुपये याप्रमाणे विक्री होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले सदरील पाण्याची बाटली ग्राहकांना योग्य किमतीत(15) रुपये प्रमाणे मिळणे आवश्यक आहे याची कल्पना देण्यात आली व यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली तसेच ग्राहकाच्या विविध इतर मागण्या बाबत आगारप्रमुखाशी चर्चा करून कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात आली आगार प्रमुखांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कारवाई करण्याबाबत आश्वासन देण्यात आले
बस स्थानकात मोठ्या प्रमाणात स्वच्छता ठेवण्यात यावी जेणेकरून बीड जिल्ह्यात गेवराई आगार स्वच्छतेच्या दृष्टीने प्रथम राहील असा प्रयत्न करण्यात यावा असे चर्चेनुसार सांगण्यात आले तसेच बस स्थानकामध्ये पंखे व लाईटची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करावी जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही तसेच बस स्थानकातील खाद्यपदार्थ योग्य दरात मिळावेत व त्याचा दर पत्रक(भाव फलक) बस स्थानकामध्ये लावण्यात यावा जेणेकरून ग्राहकांना योग्य दरात खाद्यपदार्थ मिळतील याबाबत कारवाई करण्यात यावी तसेच आपल्या आगारातून सुटणाऱ्या बस सुस्थितीत व वेळेवर सोडण्यात याव्यात जेणेकरून ग्राहकाचा वेळ वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी वरील विविध मागण्याचे निवेदन माननीय विभागीय व्यवस्था बीड व तहसीलदार गेवराई व आगारप्रमुख गेवराई यांना देण्यात आले वरील निवेदनावर तात्काळ कारवाई करावी अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा गेवराई यांच्या वतीने करण्यात आली या निवेदनावर ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्य मा. व ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख अनिल बोर्डे ग्राहक पंचायत कार्यकर्ते अशोक देऊळगावकर मोहन राजहंस गणेश रामदासी विश्वास चपळगावकर उपाध्यक्ष न. प. मा. व राजेंद्र सुतार मा. न. प. सदस्य श्रीरंग बजरंग दळवी व रामेश्वर थळकर इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत