सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी सोन्याबापू पवळ यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न
आष्टी। ए बी कदम
गेले अनेक वर्षापासून आरोग्य सेवेमध्ये पोस्टमार्टमचे काम प्रामाणिकपणे करणारे सोन्याबापू पवळ हे एकमेव कर्मचारी असून त्यांनी आजपर्यंत अनेक पोस्टमार्टम तालुक्यातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्या ज्या वेळी गरज लागली त्या त्या वेळी त्यांनी जाऊन पोस्टमार्टमसाठी मदत केली तसेच जनतेसाठी आरोग्य सेवा देण्याचे काम त्यांच्या हातून झाले असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ जयश्री शिंदे यांनी केले त्या सुलेमान देवळा येथील आरोग्य कर्मचारी (पोस्टमार्टम ऑपरेटर) सोन्याबापु पवळ यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवार दि ३० जून रोजी आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ नारायण वायभसे, डॉ नितीन मोरे, डॉ प्रसाद वाघ,डॉ घोडके,पत्रकार अविनाश कदम, रशिद शेख, परी शेख, सुरेश सानप, पंडित घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ जयश्री शिंदे म्हणाल्या की सोन्याबापु पवळ यांनी ३२ वर्षे प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देण्याचे काम केले व सर्वसामान्य, गोरगरीब सर्वांसाठी मदत करत होते. कारण ते कोणतेच काम नाही म्हणत होते पोस्टमार्टम करायचे असल्यास तालुक्यात कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांना मदत करत होते.त्यांनी आजपर्यंत पाचशेहुन अधिक पोस्टमार्टम केली आहेत.
आणि आरोग्य खात्यात प्रामाणिकपणे त्यांनी काम केले. त्यामुळे त्यांच्या कामाची उणीव आणि त्यांची आम्हाला कायम भासणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी सरपंच शिवा शेकडे, पत्रकार समीर शेख, अण्णासाहेब साबळे,अमोल जगताप, दादासाहेब पवळ, अतुल जवणे, शहानवाज पठाण, संदिप घोडके,आजिनाथ गायकवाड, पोपट घोडके, काकासाहेब घोडके यांच्यासह आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका,ग्रामस्थ, अपेष्ट नातेवाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवराचे स्वागत प्रेम पवळ यांनी केले. प्रास्ताविक सुरेश सानप यांनी तर सूत्रसंचालन अमोल जगताप यांनी केले तर आभार अशोक खोरदे यांनी मानले.