ठाणे प्रतिनिधी : संजय पंडित
महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेला दुष्काळी तालुका म्हणजे सांगली जिल्ह्यातील जत तालुका.मूलभूत सुविधांचा अभाव आणि खडतर परिस्थितिचा संघर्ष करीत येथील तरुण मात्र विविध विभागात आपल्यातील गुण कौशल्याद्वारे नावलवकिक मिळवीत आहेत.तरूनांमधील या कलागुणांमुळे जत तालुक्याला खेळाडूंची मोठी परंपरा लाभल्याने तालुक्यातील अनेक खेळाडूंनी विविध खेळात आपली छटा उमटवून तालुक्याची ख्याती जगभर पसरवली आहे.
याच यशोगाथेत आता भर पडली आहे राजेश व्हन्ने या नाभिक समाजातील युवकाची.
राजेश व्हन्ने या खेळाडूची नुकतीच भारतीय लॉन टेनिस संघटनेच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्याने नाभिक समाजासह जत तालुक्याच्या मुकुटात आणखी एक सन्मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सर्व साधारण नाभिक कुटुंबात जन्मलेला राजेश याने आपला पारंपरिक सलून व्यवसाय करीतच आपले महाविद्यालयीन शिक्षण जत येथे पूर्ण करताना चालण्याच्या स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत मजल मारली होती.
आज हाच खेळाडू भारतीय लॉन टेनिस संघटनेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पहात आहे.या खेळाडूच्या या दैदिप्यमान यशाने सकल नाभिक समाजाची मान अभिमानाने उंचावली असून जत तालुक्यासह सांगली जिल्ह्याचेही नाव उज्वल केले आहे.त्याच्या या महान कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जत येथील राजे रामराव महाविद्यालयाचे माजी राष्ट्रीय खेळाडू व श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलचे माजी विद्यार्थी राजेश बाळकृष्ण व्हन्ने यांची बर्लिन, जर्मनी येथे ११ जुन पासून होणाऱ्या जागतिक उन्हाळी क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय लॉन टेनिस संघटनेच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड झाली आहे.भारतीय राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण यांनी जागतिक खेळाडू तयार करण्यासाठी भारतामधे पाच विविध ठिकाणी ट्रेनिंग कॅम्प घेण्यात आले होते.
राजेश व्हन्ने सध्या जिंदाल कंपनीत मुख्य कोच तथा क्रीडा अधिकारी म्हणून गेली २३ वर्ष काम पहात आहेत.तसेच टेनिस,बास्केट बॉल,फुटबॉल, अथेलेटिक्स फुल मॅरेथॉन,हाफ मॅरेथॉन,सायकलिंग सारख्या स्पर्धांची योग्य ट्रेनिंग देखील ते देत आहेत.आज भारतील लॉन टेनिस संघटनेमध्ये विविध राज्यातील खेळाडू सहभागी होत आहेत. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षण देण्याची पूर्ण जवाबदारी व्हन्ने सर सांभाळीत आहेत.त्यांच्याच मार्गदर्शनात आजवर कितेक संघांनी वेगवेगळ्या चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत.राजेश व्हन्ने हे जत मधील राजे रामराव विद्यालयाचे मैदानी खेळाडू होते.सांगली शहर अमच्युअर अथेलेटिक्स असोसिएशनच्या वतीने चालण्याच्या स्पर्धेत,१९९४ पुणे विद्यापीठात २० किलोमिटर स्पर्धेत राजेश व्हन्ने यांचा दुसरा क्रमांक आला होता.तसेच १९९५ मधे नागपूरमधील स्पर्धेत देखील सरांनी दुसरा क्रमांक पटकावला होता.१९९९ च्या सांगलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत सरांना प्रथम क्रमांक मिळाला होता तर २०२२ मधे त्यांच्या या खेळातील कौशल्य पाहूनच गोव्यातील मेटा कोपर अलाउड लिमिटेड या नामांकित कंपनीत खेळाडूंच्या राष्ट्रीय कोट्यातून जॉब लागला होता.जॉब करीत असताना देखील ते धावण्याचा सराव करीतच होते.यावेळी त्यांनी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत देखील सहभाग घेतला.आजवर राज्याच्या सर्वच शहरांमधील मॅरेथॉन स्पर्धा मधे सहभाग घेतला असून त्यांनी २१ फुल मॅरेथॉन आणि ३४ हाफ मॅरेथॉन स्पर्धामधे भाग घेऊन घवघवीत यश मिळविले आहे.त्यांच्या या यशोकिर्तीची दखल वेळोवेळी सरकारने आणि स्पोर्ट अथॉरिटी ने घेतली असून त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. लॉन टेनिस व्यतिरिक्त ते सायकलिंग देखील करीत असून रोज दोन तास सायकल चालाविण्याचा सराव करीत आहेत.या सर्व यशोगाथे मागे त्यांचे शिक्षक प्रा.सिद्राम चव्हाण,ठोंबरे,सुरेश मोटे,एस एल पाटील,युवराज फटके,कै.राजा स्वामी, कै.पांडुरंग मस्कर, कै.शामराव गावडे या सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले होते.तसेच जतचे विद्यमान आमदार विक्रम सावंत,सुरेश शिंदे यांचे देखील मौलिक सहकार्य लाभले.जिंदाल स्टील लिमिटेड कंपनीचे एमडी संजन जिंदाल आणि संगीता जिंदाल,चेअर पर्सन जिंदाल स्पोर्टचे डायरेक्टर पार्थ जिंदाल यांचेही बहुमोल सहकार्य लाभले.यशाच्या या शिखरावर पोहचताना आई हिराबाई व्हन्ने,वडील बाळकृष्ण व्हन्ने,पत्नी वनिता व्हन्ने या कुटुंबीयांचा भरभक्कम पाठिंबा आणि नाभिक समाजातील मान्यवर समाज बांधवांचे वेळोवेळी मिळालेले प्रोत्साहन कामी आल्याचे राजेश व्हन्ने यांनी म्हटले आहे.कौतुकाची बाब म्हणजे यशाच्या एवढ्या उंच शिखरावर पोहचून देखील प्रशिक्षक राजेश यांचे पाय अजूनही जमीनीवरच आहेत.आजही आपल्या नाभिक समाजा बद्दलचा आपुलकीचा कळवळा त्यांच्या बोलण्यातून आणि विचारातून प्रकर्षाने जाणवतो.त्यांचे वडील अद्यापही जत येथे समाजाचा पारंपरिक सलून व्यवसाय करीत असून आई सर्वसाधारण कामे करीत आहे.