आ प्रा शिंदे यांना माय स्टॅम्प प्रदान टपाल कर्मचारी संघटनेचा उपक्रम

0
235

चोंडी(जामखेड): श्रीक्षेत्र चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाचे औचित्य साधत, भारतीय डाक विभागाच्या माय स्टॅम्प योजनेअंतर्गत पोस्टल स्टॅम्पचा संच मा आमदार श्री राम शिंदे यांना उपविभागीय डाक निरीक्षक श्री अमित देशमुख,पोस्टल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री संतोष यादव ,श्री सागर कलगुंडे, श्री संदिप कोकाटे ,श्री महेश मासाळ यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
चोंडी येथे संपन्न झालेले जयंती उत्सवाच्या मुख्य कार्यक्रमानंतर मा आ श्री राम शिंदे यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मा श्री राम शिंदे यांचे राजकीय सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अतिशय अनमोल व महत्त्वपूर्ण असून या बाबीचे कौतुक म्हणून नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज ,व सहयाद्री प्रतिष्ठान यांचे वतीने माय स्टॅम्प मा श्री राम शिंदे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री अमित देशमुख यांनी मायस्टॅम्प या योजनेसह पोस्टाच्या विविध योजनेची सविस्तरपणे माहिती विषद केली, या प्रसंगी उपस्थिती सर्वानी डाक विभागाच्या या योजनेचे विशेष कौतुक केले.
मा प्रा श्री राम शिंदे साहेब यांनी बोलताना मायस्टॅम्प या योजनेचे विषय कौतुक करत,श्री सागर कलगुंडे,व महेश मासाळ यांच्या सह नॅशनल असोसिएशन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज अहमदनगर यांना विशेष धन्यवाद दिले.
यावेळी श्री अशोक बंडगर, श्री दिपक काळे,रावसाहेब चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संदिप कोकाटे, प्रास्ताविक श्री अमित देशमुख, सूत्रसंचालन श्री संतोष यादव तर आभार श्री दिपक काळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here