गेवराई (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणण्यासाठी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व आ. लक्ष्मण पवार यांनी पाठपुरावा केला आहे त्या अनुषंगाने गेवराई शहरातील तय्यबनगर येथे दारूलुम ते आत्तार समाजाचे कब्रस्तान येथे डांबरीकरण रस्ता, ताकडगाव रोड ते घाटुळ नाना, बंडु पवार, रमेश नवले, सेंट झेवियर्स गेट पर्यंत, ताकडगाव रोड येथे ढोराज काप्लेक्स ते शारदा विद्दा मंदिर, कोल्हेररोड येथे नगरपरिषद काप्लेक्स ते स्टेडियम ते मुन्ना देसले यांच्या घरा पर्यंत गणेश नगर येथे उध्दव मडके यांच्या घरा पासून ते शेख जमादार यांच्या घरा पर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रिलॅबल कुलिगं शाप पर्यंत, ३ कोटी रुपये डांबरीकरण रस्ता कामाचा शुभारंभ खा. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते व आ. लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले दि. २६ मे2023 रोजी नगरपालिका अतंर्गत गेवराई शहरातील डांबरीकरण रस्ता कामाचे उद्घाटन खा. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते तर आ. लक्ष्मण पवार उपस्थितीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांची प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी शिवराज पवार, मा. नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, तालुका प्रमुख शिनुभाऊ बेद्रे, सर्जेराव तादंळे, मा.उपनगराध्यक्ष राजेद्र राक्षसभुवनकर, जानमहंमद बागवान, दादासाहेब गिरी, राहुल खंडागळे, याहीया खान, बंडु बारगजे, पत्रकार मधुकर तौर, ब्रम्हदेव धुरंधरे,भरत गायकवाड,, राम पवार, संजय इगळे, बद्दोद्दीन, डॉ. आबेद जमादार, सचिन मोटे, अब्दुल भाई, पिटु साळवे, पत्रकार सुभाष सुतार, विनोद पौळ, भागवत जाधव, प्रसाद कुलकर्णी, सुशील टकले, शेख ईर्शाद, आदी उपस्थित होते
गेवराई नगरपालिकेसाठी दहा महिन्याच्या कालावधीत शिवसेना भाजपा युती सरकारच्या माध्यमातून आ. लक्ष्मण आण्णा पवार यांनी कोट्यवधी निधी खेचुन आणुन शहरातील प्रत्येक भागात अनेक ठिकाणी सिमेंट नाली रस्ता, सभामंडप अशा प्रकारे विविध विकास कामे गेवराई शहरात चालू आहेत त्या अनुषंगाने आज दि. २६ मे शुक्रवार रोजी खा. प्रितमताई मुंडे व आ. लक्ष्मण आण्णा पवार यांच्या उपस्थितीत विकास कामांचा शुभारंभ संपन्न झाला आहे यावेळी, महादेव बेद्रे, माजेदभाई, मुन्ना मोटे, शेख निसार, मोहन राखुडे, मतीन कुरेशी, हासन, शौहेब आत्तार, अनिल आगुडे आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
Home Uncategorized खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते व आ.लक्ष्मण पवारांच्या उपस्थितीत डांबरी रस्ता कामाचा शुभारंभ