गेवराई (शुभम घोडके) शैक्षणिक कारकिर्दीत बारावी हा महत्त्वाचा टप्पा असतो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने मार्च एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जय भवानी कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावीत शिकत असलेली पवार काजल युवराजसिंग हिने कला शाखेतून एकुण 600पैकी528 गुण मिळवून गेवराई तालुक्यात सर्वप्रथम यशस्वी झाली आहे
तसेच आवड आणि आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द काजलने बाळगली अन् बारावीच्या परीक्षेत 88.00 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली असून अभ्यासाचे योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमातून तिने 88.00 टक्क्यांसह परीक्षेत यश प्राप्त केले त्यामुळे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे