आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्ड महाविद्यालयाची,विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु.तवले प्रतीक्षा विजयकुमार इयत्ता बारावी बोर्डात 93 टक्के म्हणजे 600 पैकी 555 गुण मिळवून आष्टी तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.कु.भिसे आकांक्षा सुरेश हिने 90 टक्के गुण प्राप्त केले आहेत.कु.फुंदे आदिती आत्माराम हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे.बहुतेक सर्व शाखेचे निकाल शंभर टक्के लागलेले आहेत.महाविद्यालयाच्या कला शाखेत अनुक्रमे कु.मांढरे साधना बापू,कु.कारंडे वैष्णवी गहिनीनाथ,कु.साप्ते सायली दादासाहेब,वाणिज्य विभागात कु.मुळे ज्ञानेश्वरी लक्ष्मण,भंडारी यश प्रकाश, कु.देवधारकर हिना गणेश तर व्यवसाय शिक्षण या शाखेत तावरे रितेश दत्तू,आजबे प्रज्योत काशिनाथ ,देसाई अभिजीत भीमराव यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय येण्याचा मान मिळवला आहे.इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल बद्दल आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर,दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.प्रताप गायकवाड,डॉ.गणेश पिसाळ,सर्व संचालक मंडळ,प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,उपप्राचार्य अविनाश कंदले,कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,प्रा.अशोक भोगाडे,सर्व प्राध्यापक,कर्मचारी वृंद यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.