आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांचे पुतणे आणि आष्टी येथील गणेश विद्यालयाचा माजी विद्यार्थी रोहन सुभाष निंबोरे याने एमबीबीएस पदवी गुणवत्तापूर्ण संपादन केली आहे.इयत्ता बारावी विज्ञानचे शिक्षण लातूर येथील शाहू महाविद्यालयातून पूर्ण केले असून पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील विळद घाट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले.वडील सुभाष रावसाहेब निंबोरे आणि आई विद्या हे दोघेही परिश्रमी शेतकरी असून कर्जत तालुक्यातील नागापूर येथे रोहन निंबोरेच्या माध्यमातून वैद्यकीय ज्ञानाची बाग त्यांनी फुलवली आहे.या यशाबद्दल संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर, दिलीप शेठ वर्धमाने,डॉ.प्रताप गायकवाड, डॉ.गणेश पिसाळ,सर्व संचालक मंडळ, उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे, उपप्राचार्य अविनाश कंदले,कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,प्रा.अशोक भोगाडे,सर्व प्राध्यापक,कर्मचारी वृंद यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.