विनोद पौळ : कृतिशील विचारांचा पत्रकार

0
177
काही गोष्टींचे अनेकांना आकर्षण असते. वलयांकित क्षेत्राला समाज मान्यता ही असते. त्यामुळेच, त्याचे कौतुक वाटत राहते. पत्रकारिता त्याला अपवाद नाही. आपण ही त्या दिशेने का जाऊ नये. हा साधा हिशोब करून त्यांना ही मुद्रीत माध्यमांनी भुरळ घातली. दहा वर्ष झाली. ते लोकाशा वृत्तपत्राचे बातमीदार आहेत. विनोद पौळ, मु.पो. गेवराई ता. गेवराई जि.बीड ( मराठवाडा ) यांचा पत्रकारितेतला प्रवेश गावच्या प्रेमापोटी झालेला आहे. 

गुरूवार ता. 11 मे. रोजी त्यांचा वाढदिवस. या निमित्ताने, चांगला युवा मित्र म्हणून विनोद या॔च्या विषयी दोन शब्द लिहून त्यांचे अभीष्टचिंतन करता आले.
आपल्या गावाकडची बातमी एखाद्या छोट्या-मोठ्या पेपरात छापून यावी, अशी इच्छा असलेल्या विनोद पौळ यांनी शोधाशोध करून एका पत्रकार मित्राचा शोध घेतला आणि आमच्या गावात ( सुशी ता. गेवराई जि.बीड ) पहिल्यांदाच बाजार भरणार आहे. त्याची बातमी द्या, अशी विनंती धस नावाच्या एका पत्रकार मित्राला केली. त्यांनी ती बातमी दिली. गावची बातमी पेपरात येताच
विनोद यांना आनंद झाला होता. ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे ( जनसंपर्क अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)
यांनी गढी ता. गेवराई येथे भाषण झाले होते. त्यांच्या वकृत्वाने त्यांना भुरळ घातली.
त्यानंतर, आपण ही पत्रकारिता करावी. असा विचार करून त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले आणि सुरू झाला त्यांचा पत्रकारितेतला श्रीगणेशा..!
विनोद पौळ मनाने खूप छान स्वभावाचे आहेत. फार आदळआपट करायची नाही. मनाला आवडेल तेच करायचे. इगो न ठेवता कामात व्यस्त राहणारा पत्रकार म्हणून विनोद यांची ओळख झाली आहे.
त्यांनी बातमीतल्या सॉफ्ट कॉर्नरला महत्त्व दिले. त्या दृष्टीकोनातून त्यांनी पत्रकारिता केली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी दिलेले योगदान अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. अध्यात्म त्यांच्या आवडीचा विषय झाला आहे. सांस्कृतिक, सांप्रदायिक व्यासपीठावर त्यांचा वावर असतो. त्यांना ते मनापासून आवडते. बीड जिल्ह्य़ातील अनेक महत्त्वाच्या गडांशी त्यांचा स्नेह राहीला आहे. गोरक्षनाथ संस्थानचे महंत हभप दत्ता महाराज गिरी, धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नगदनारायण गडाचे महंत हभप शिवाजी महाराज
त्यांना व्यक्तिश: नावाने ओळखतात. हे त्यांचे यश म्हणता येईल. या गडाच्या असंख्य बातम्या त्यांनी
कोणत्याही लाभा शिवाय लिहिल्या आणि प्रसिद्ध केल्यात. वेळ काढून कीर्तन महोत्सवात हजेरी लावायची. त्याची बातमी करायची. विविध वृत्तपत्रात छापून आणायची. इथपर्यंतची काळजी ते घेत आलेत.
पत्रकार म्हणून काम करताना नेमकी जबाबदारी पार पाडली आहे. सुशी, ता. गेवराई जि.बीड ,त्यांचे जन्म गाव आहे. त्यामुळे, ग्रामीण भागातल्या समस्यांचा सतत वेध घेत राहतात. आपल्याच गाव परिसरात
एका गरीब कुटुंबातील कर्ता माणूस दुर्धर आजाराने घरात पडून होता. या एका घटनेने ते कुटुंब उघड्यावर आले. त्यांना घटना समजली. त्या घटनेची माहिती मिळवली.
दै. लोकाशा वृत्तपत्रात, त्या संदर्भाने बातमी करून बांधिलकी जोपासली.
त्या बातमीची समाजाने दखल घेतली. एकाच दिवसात त्या गरजू कुटुंबाला पंच्याहत्तर हजार रू ची मदत झाली होती. बातमी मूल्य सांभाळून , त्या घटनेच्या माध्यमातून , विनोद यांनी
शाश्वत धर्माला समाजाभिमुख करायची भूमिका पार पाडली. जय भवानी न्यूज पेपर एजन्सी, बीड चे पेपर विक्रेते ते सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा समाजसेवक परमेश्वर खरात यांनी पत्रकारितेत येण्यासाठी मार्गदर्शन केल्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. विनोद हे साईंचे निस्सीम भक्त आहेत.
समर्थ रामदास म्हणायचे, जैसे बोलणे बोलावे, तैसे चालणे चालावे. या न्यायाने, विनोद यांचा
नियंत्रित आणि कृतीशिल पत्रकारितेवर भर राहीला आहे. त्यांनी नेहमीच संयमी भूमिकेतून पत्रकारिता केली. ते मृदू भाषिक आहेत. त्यांचे बी.ए.बी.एड.झाले आहे. मामाच्या मुलीशी त्यांचे लग्न झाले. सौ. शुभांगी ताई त्यांच्या आयुष्यात आल्या. पत्नीने तिच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे म्हणून त्यांनी प्रोत्साहन दिले. बी.ए, डिएड केले. त्या शिवाय डिफार्मसी सारखा व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या साठी एक जोडीदार म्हणून विनोद यांनी आदर्श पतीची भूमिका निभावली आहे. सुखी संसारात एक मुलगी “सई” आली आहे. पौळ कुटुंबाला नगदनारायण गडाचा आशीर्वाद लाभला. संचित असेल तर ते नक्की आयुष्यात उभे राहते. विनोद पौळ, गेवराई शहरातील, मुक बधिर शाळेवर कार्यरत आहेत. बातमीकडे बातमी म्हणून पाहणे. ती वृत्तपत्रात प्रसिद्ध करून आपली जागल्याची भूमिका प्रमाणीकपणे पार पाडणारा हा युवा पत्रकार गेल्या दहा वर्षांपासून बातमीशी एकरूप होऊन काम करतोय. डाव-उजवे न होऊ देता, बातमीला न्याय देण्यासाठी तत्पर राहीला आहे. प्रा. शिवाजीराव भोसले यांनी सांगितलय, समाजऋण शाश्वत धर्म आहे. विनोद यांनी पत्रकारितेतल्या धर्माला जागून सर्व समावेशक बातमीदारीवर भर दिला आहे. ग्रामीण भागातली माणसे जोडली आहेत. मित्रांचा गोतावळा मिळवला आहे. बातमीतले ते अजातशत्रू आहेत.
गुरूवार ता. 11 मे . 2023 रोजी, त्यांचा वाढदिवस, या निमित्ताने
सोशल नेटवर्किंग च्या विविध माध्यमांवर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. विनोद, तुमच्या पावलांना समाजाच्या, आई-वडील, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रांच्या आशीर्वादाने प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. ही मिळालेली, कमावलेली प्रतिष्ठा आणखी वाढविण्यासाठी कार्यरत राहून बातमीला आकार द्या. एवढीच अपेक्षा. विनोद भैय्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा..!

  • प्रासंगिक
    श्री.सुभाष सुतार,गेवराई
    ( पत्रकार )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here