दिवे घाटात भीषण अपघात, दुचाकीला धडक देत टँकर थेट दरीत कोसळला !

0
351

पुणे : पुण्याजवळील दिवे घाटमार्गात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. वर्दळीचा मार्ग असलेल्या या घाटरस्त्यात भरधाव वेगातील टँकर पलटी झाला आणि दरीत कोसळला. या टँकरने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण स्वरूपाचा होता की टँकरची धडक बसून चौघा दुचाकीस्वारांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताने दिवेघाट महामार्गातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातग्रस्त टँकरच्या केबिनमध्ये दोन जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या दोघांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत. सायंकाळच्या सुमारास अपघात झाल्यामुळे अंधारात बचावकार्य करताना अग्निशमन दलाच्या जवानांना आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. या अपघाताची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here