नवी दिल्ली : पावसाळा असो की उन्हाळा अंड्यांची मागणी असते. अंड्यांपासून तयार झालेला आमलेट लोकं पसंत करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्यांच्या अंड्यांची मागणी करतात. अंड्यांचे भावही वेगवेगळे आहेत. सहसा कोंबडीचे अंडे सहा ते १० रुपयांत मिळतात. पण, असेही काही अंडे असतात की जे १०० रुपये किमतीला विकले जातात. अशावेळी शेतकरी कोंबडी पालन करून चांगली कमाई करू शकतात बहुता पोल्ट्री फार्ममध्ये एका प्रजातीच्या कोंबड्यांचे पालन केले जाते. एका अंड्याची किंमत सहा ते १० रुपये असते. परंतु, कडकनाथ कोंबडीचे अंडे आणि मांस दोन्हीची किंमत जास्त असते. कडकनाथच्या एका अंड्याची किंमत ३० ते ३५ रुपये आहे.