नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
कंधार, लोहा विधानसभा आमदार मा. श्री शामसुंदरजी शिंदे साहेब यांच्या अर्धांगिनी शेकाप च्या प्रदेशाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्त्या आ.सौ. आशाताईंनी शिंदे यांनी आमदार साहेबांच्या विकास कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली, आगामी काळात कार्य सतत चालूच राहणार अशी ग्वाही दिली. कार्यकर्ते मंडळींना आगामी काळात ताकदीनिशी निवडणुका लढवण्याचे आव्हान केले , व शिंदे कुटुंबीय मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे रहाणार असल्याचे सांगितले. प्रसंगी बऱ्याच कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. पक्षाचे मराठवाडा सरचिटणीस विक्रांत भाऊ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, कंधार बाजार समिती सदस्य ज्ञानेश्वर पाटील चोंडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, जिल्हाध्यक्ष बालाजी इसादकर, लोहा खरेदी विक्री संघ उपसभापती श्याम अण्णा पवार, माझी पंचायत समिती सदस्य जनार्दन तिडके, अल्पसंख्यांक शेकाप जिल्हाध्यक्ष शेरू भाई, उपाध्यक्ष अवधूत पेटकर, शहराध्यक्ष महेश पिनाटे, तालुकाध्यक्ष नागेश हिलाल व सद्दाम कंधारी, मगदूम शेख, एजाज भोसीकर, कुदळकर, अशोक बोधगिरे, सहप्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मतदार संघातील अनेकांनी पक्षात प्रवेश केला. शहरातील बहादरपुरा येथून कार्यकर्त्याच्या उपस्थितीत मोटारसायकल रॅली काढण्यात आली यावेळी आशाताई शिंदे म्हणाल्या. कार्यकर्त्यांच्या कुठल्याही अडचणीच्या वेळी आमदार साहेब व कुटुंबीय खंबीरपणे पाठराखण करणार. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. यावेळी सरपंच कुंडलिक पाटील बोरगावकर, सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, सरपंच बंडू पाटील पवार, सरपंच सखाराम पाटील लोंढे, सौ. उज्वलाताई बालाजीराव गुरसुडकर, सरपंच शाहू ताई सुनील कांबळे, कार्यकर्ते पदाधिकारी महिला भगिनी बहुसंख्येने हजर होते….