अपघातात मदत करणाऱ्या बचाव पथकाचा सत्कारमहामार्ग पेट्रोलिंग पथकाचे कार्य कौतुकास्पद – पोलिस निरीक्षक धनंजय फराटे

0
207

गेवराई प्रतिनिधी

अचानक झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या माणसांचा जीव वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या
महामार्ग पेट्रोलिंग पथकाचे कार्य कौतुकास्पद असून, त्या टीमचा सत्कार करण्याची बांधिलकी म्हणजे , आपले कर्तव्य असल्याची भावना
पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी येथे व्यक्त केली.
राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करणाऱ्या महामार्ग पेट्रोलिंग पथकाचा 1 मे. रोजी, कामगार दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.
गेवराई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या पुढाकारात सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
दि. १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून ( घटना-अपघात व्यवस्थापक पथक ) महामार्ग पेट्रोलिंग टीमचा गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ( क्रमांक 52 ) अपघात झाल्यास त्वरित महामार्ग पेट्रोलिंग टीम व १०३३ न्हाईची (NHAI ) रुग्णवाहिका तात्काळ हजर होऊन, जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येते. तसेच अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात येतात. परिणामी अपघातातील जीवित हानी टळते. स्वतः पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी बचाव टीमचे कौतुक करून, महामार्ग पेट्रोलिंग टीमचे इन्चार्ज राधाकिसन अडसूळ , इन्चार्ज नामदेव शिंदे , मेन्टेनन्स इन्चार्ज बालाजी कदम , तसेच महामार्ग पेट्रोलिंग सुपरवायझर प्रतीक कदम, कंट्रोल रूमचे योगेश ठोसर, बाळासाहेब काटे, सुनील कवडे आदींचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here