गेवराई (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची गेवराई तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये तालुका अध्यक्षपदी अंकुश आतकरे शहराध्यक्षपदी प्रदीप जोशी तालुका उपाध्यक्षपदी भागवत देशपांडे राजेंद्र नाटकर तर तालुकासचिव पदी तुळशीराम वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची शासकीय विश्राम गृह येथे दिनांक 1 मे रोजी दुपारी 2 वाजता बैठक घेण्यात आली. ही बैठक प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे व संतोष मानूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या सूचनेनुसार घेण्यात आली. बैठक ज्येष्ठ संपादक तथा मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष सुनील पोपळे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ संपादक शिवाजी मामा ढाकणे ज्येष्ठ पत्रकार काझी अमान यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी सर्वांनुमते गेवराई तालुक्याचे अध्यक्षपदी अंकुश आतकरे, शहराध्यक्षपदी प्रदीप जोशी, गेवराई तालुका उपाध्यक्षपदी भागवत देशपांडे, राजेंद्र नाटकर तर तालुकासचिव पदी तुळशीराम वाघमारे, तालुका कार्याध्यक्षपदी अनिल आंगूडे, तालुका कोषाध्यक्षपदी अरविंद कुलकर्णी, तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी सिद्धांत मोरे, सहकार्याध्यक्षपदी सुदर्शन देशपांडे, सहकोषाध्यक्षपदी वाल्मीक कदम, तालुका सह सचिव पदी, सचिन नाटकर, गणेश वीर, सदस्यपदी अमोल वैद्य, दत्तात्रय लाड, रामहरी काकडे, सय्यद कौसर, नितीन वाकडे, ज्ञानेश्वर जाधव सुमीत करडे, मारोती गाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष अंकुश आतकरे म्हणाले संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या व पत्रकारांना न्याय देण्याची काम यापुढे करण्यात येईल पत्रकारांसाठी विविध योजना देखील राबवण्यात येतील यावेळी बैठकीचे सूत्रसंचालन अनिल आगुंडे यांनी तर आभार प्रदीप जोशी यांनी मानले.