गेवराई प्रतिनिधी
शहरातील व जेष्ठ नागरिक यांच्या मागण्या बाबत निवेदन देण्यात आले असून, गेवराई शहरातील जेष्ठ नागरिकांना व अपंग व्यक्तींना आपल्या नगर परिषद मार्फत एक गाळा किंवा जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सध्या शहरात जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे जेष्ठ नागरीक इतर ठिकाणी कोठेही बसतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभिरपणे दखल घेऊन गाळा किंवा जागा उपलब्ध करून द्यावी ही विनंती करण्यात आली असून, शहराचा आकार चोहोबाजुंनी वाढत आहे. शहरात प्रत्येक वार्डात जेष्ठ नागरिकांना व अपंगाना बसण्यासाठी बेंच उपलब्ध नाहीत. कोल्हेर रोड तसेच ताकडगाव रोड , शास्त्री चौक येथे तातडीने बेंच उपलब्ध करून द्यावेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक महत्वाचे ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्या बाबत योग्य ती कार्यवाही करावी. आपल्या कार्यालयात जेष्ठ नागरिक अपंगाची कामे प्राधान्याने करण्यात यावी.
जेष्ठ नागरिक तसेच अपंग व्यक्ती अजारी पडल्यास रुग्णवाहिका आपल्या कार्यालया मार्फत उपलब्ध करून देण्यात यावी. वरील मुद्यांची तातडीने दखल घेवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी गेवराई नप च्या प्रशासनाला केली असून, तहसीलदार व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.