गेवराई (शुभम घोडके) कॉम्प्युटर क्षेत्रात दर्जेदार काम करणाऱ्या अशा कुशल शिवकमल कॉम्प्युटर, गेवराई या सेंटरचा गेवराई शहरासह ग्रामीण भागात बोलबाला वाढला आहे. अल्पवधीत या कॉम्प्युटर सेंटरने विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे या सेंटरचे संचालक श्री प्रशांत ठोसर सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तळमळीने शिकवतात तसेच आजच्या युगात कम्प्युटर आणि इंटरनेटचा वापर आता प्रत्येक घरात, शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा, विद्यापीठ, दुकाने अशा अनेक ठिकाणी होतो आहे. विद्यार्थी, उद्योजक, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी, सर्वजण विविध कामांसाठी आता इंटरनेटचा वापर करायला लागले आहे. तसेच केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागाच्या जसे पोलीस भरती, रेल्वे भरती, सैन्य भरती, पोस्ट भरती अशा विविध नोकऱ्यांसाठी शासनाने एमएस – सीआयटी कोर्स अनिवार्य केल्याने उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांचा कल हा एमएस-सीआयटी कोर्स कडे मोठ्या प्रमाणात दिसून येतो म्हणून एमकेसीएल नी कोर्समध्ये आवश्यक असे बदल केलेले आहे स्मार्ट टायपिंग स्किल, विंडोज 10, ऑफिस 2013, गुगल कोडींग स्किल्स, सायबर सेक्युरिटी स्किल असे नवीन स्किन आता विद्यार्थ्यांना एमएस-सीआयटी कोर्स मध्ये शिकायला मिळणार आहे. या अत्याधुनिक एमकेसीएलच्या प्रणालीमुळे या कोर्सचा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाल्यामुळे जगातल्या श्रीलंका, सौदी अरेबिया, इजिप्त या देशांनी एमएस-सीआयटी कोर्स चे शिक्षण एमकेसीएलच्या माध्यमातून त्यांच्या देशात सुरू केले आहे हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या व यामधील अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक देशांमध्ये चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यामुळे आता एमएस- सीआयटी कोर्स पूर्ण करण्यासाठी गेवराई शहरातील बाजार रोड, महात्मा फुले सिटी, सेंटर येथिल नामांकित शिवकमल कॉम्प्युटर एज्युकेशन एमकेसीएल मान्यता प्राप्त केंद्रावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो आहे. महाविद्यालयातील व शालेय विद्यार्थी यांना या कोर्स चा फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच टायपिंग, टॅली, एम एस सी आय टी, अशा विविध प्रकारचे कोर्स इथे शिकवले जातात शिवकमल कॉम्प्युटर या शाखेने गेवराई शहराच्या मध्यवर्ती भागात आपले स्थान अतिशय लोकप्रिय केले आहे. संचालक प्रशांत ठोसर अतिशय प्रांजळ मनाने विद्यार्थ्यांचे हित जोपासून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि विद्यार्थ्यांचे प्रेम जोपासून विद्यार्थी निरोप घेत असताना अश्रू अनावर करतो हे नेहमी अनुभवायला मिळालं म्हणून सातत्याने विद्यार्थ्यांचे हितासाठी शिवकमल कॉम्प्युटर या शाखेचे योगदान मोलाचे ठरत आहे.
Home Uncategorized विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारे -शिवकमल कॉम्प्युटर