डॉ. सुजीत उत्तम हजारे यांचा सिरसमार्ग ग्रामस्थांकडून नागरी सत्कार ग्रामपंचायत कार्यालय, समर्थ विद्यालय, समाजबांधवाकडून गौरव

0
421

गेवराई, ( प्रतिनिधी ) एमबीबीएस परिक्षेत उतुंग यश मिळवुन, सिरसमार्ग गावचे नाव रोशन केल्याबद्दल, सिरसमार्ग येथील भूमीपूत्र तथा दैनिक लोकाशाचे निवासी संपादक उत्तम हजारे यांचे चिरंजीव डॉ. सुजीत हजारे यांचा सिरसमार्ग ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला . विविध पक्ष संघटना व मित्र परिवाराच्या वतीने डॉ. सुजीत हजारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

सिरसमार्ग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व समाजबांधवाच्या वतीने डॉ. सुजीत हजारे यांचा पूज्य भन्ते धम्मशील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी शेकडो समाजबांधव, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. मादळमोही येथील जिल्हा परिषदेचे माजी सभापती पंढरीनाथ लगड, कोळगावचे पत्रकार बाळासाहेब घाडगे यांनी डॉ. सुजीत यांचा सत्कार केला. सिरसमार्ग येथील सिंदफणा पतसंस्थेत अध्यक्ष दिनेश गुळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. सुजीत यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला, यावेळी बँकेतील कर्मचारी उपस्थित होते. सिरसमार्ग येथील समर्थ विद्यालयाच्या वतीने डॉ. सुजीत हजारे यांचा भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी संस्थेचे सचिव सुभाषराव पवळ, भारत मगर सर, बेद्रे सर, काशीद सर, जमदाडे सर, शिंदे सर, टाकसाळ सर, शरद मगर सर, आहेर सर, करांडे सर, पवळ सर, कात्रजकर सर, केंद्रे मॅडम आदींची उपस्थिती होती. ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. सुजीत हजारे यांच्या सत्काराचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी ह. भ. प. धुराजी महाराज कोळेकर, माजी सभापती पांडुरंगराव कोळेकर, सरपंच सुरेश मार्कड, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कुडके, माजी सरपंच सोमेश्वर गंचाडे, राहूल हजारे, संतोष परदेशी, दिमाखवाडीचे सरपंच दिलीप पवार, डॉ. गवळी, नागेश रडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोडके यांनी केले. व्यापारी बांधवाच्या वतीने मधुकर पवळ यांनी डॉ. सुजीत हजारे यांचा सत्कार केला.

चौकट

नोटांचा हार घालून सत्कार
सिरसमार्ग गावात ठिकठिकाणी विविध संस्था व मित्र परिवाराच्या वतीने डॉ. सुजीत हजारे यांचा सत्कार करण्यात आला. बीड येथील सरस्वती विद्यालयाचे संस्थापक तथा संस्थाचालक महामंडळाचे जिल्हा सरचिटणीस उत्तमराव पवार, काँग्रेस अनु.जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार व पवार परिवाराच्या वतीने नोटांचा हार घालुन, डॉ. सुजीत उत्तम हजारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here