शिफा हॉस्पिटल उद्घाटन सोहळ्याला रमजान ईदला एक महिना पूर्ण           

0
150

आष्टी प्रतिनिधी 

आष्टी येथे डॉ.आबिद हुसेन नदाफ आणि डॉ.आफरीन शेख यांच्या शिफा हॉस्पिटलला दिनांक 22 एप्रिल रोजी म्हणजेच रमजान ईद दिवशी एक महिना पूर्ण झाला आहे. मा.देविदास आबा धस,मुफ्ती शफी साहेब,जयदत्त भैय्या धस यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते.तसेच शिफा हॉस्पिटलला लागूनच मौजे जामगाव येथील तसलीम फारुक सय्यद यांच्या लोकसेवा मेडिकल अँड जनरल स्टोअर चे उद्घाटनही यावेळी करण्यात आले होते.डॉ.आबिद हुसेन नदाफ यांच्या शिफा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभाग व ट्रॉमा केअरची सुविधा असून ब्लड प्रेशर,मधुमेह,हृदयरोग,थायराइड,डेंग्यू टायफाईड,दमा,पॅरालीसीस, मणक्याचे आजार,मेंदू ज्वर,सर्पदंश,विषबाधा,त्वचारोग,संधिवात,पोटाचे विकार, मुतखडा यावर उपचार केले जात असून प्रसूती विभाग सुविधा तथा स्त्रियांचे सर्व आजार यावरील उपचार येथे उपलब्ध आहेत.शिफा हॉस्पिटल मध्ये रक्त,लघवी तपासणी,तज्ञ डॉक्टरांच्या भेटी,24 तास अत्यावश्यक सेवा,ऍडमिट करण्याच्या सुविधा येथे उपलब्ध आहे.डॉक्टर असोसिएशनचे डॉ.विलास सोनवणे यांच्यासह,रंगनाथ धोंडे,नामदेव भाऊ राऊत,महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे,चेअरमन आदिनाथ सानप,डॉ.नदीम शेख,अरुण भैय्या निकाळजे,कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन,आष्टी तालुक्यातील सर्व पत्रकार,व्यापारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here