कंधार प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
,जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने मागील अकरा वर्षापासून बारा ही महीने आपले सम्पूर्ण जीवन उघड्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या निराधार आणि गरजू बांधवांसाठी सेवेचे कार्य करत आहे,प्रतिष्ठान च्या सेवाभावी कार्याची दखल आज पर्यंत अनेक दानशूर मंडळी व शासकीय प्रशासकीय अधिकारी यांनी घेतली असून त्यांनी जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन व उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांना आर्थिक व वस्तु रुपात देखील मदत केली आहे.
त्याच प्रकारे उन्हाळयात वाढत्या गर्मी पासून सर्व सामान्य जनतेला अल्पसा आधार म्हणून त्यांची तहान भागविण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने माऊली पाणपोई च्या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांचा शुभ हस्ते करण्यात आला.
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन,उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी यांच्या या सेवाभावी उपक्रमाची दखल धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी घेतली. असून त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार,कै.जयराम भंदाजी पाठील,कै.राजेंद्र जयराम पाटील,कै.सुरेंद्र जयराम पाटील यांचा पूण्यस्मरणार्थ प्रतिष्ठान ला माउली पाणपोई साठी अखंड जल सेवेची मदत केली आहे, तसेच मांडळ गावातील भारत मंडप अँड कॅटरिंग चे संचालक जिवन चौधरी यांनी पाणपोई साठी लागणारे मंडप याची दोन महिने पर्यंत निःशुल्क सोय करून दिली.
त्या बद्दल प्रतिष्ठान च्या वतीने त्यांचे आभार मानन्यात आले.
माऊली प्रतिष्ठान च्या शुभारंभ प्रसंगी जि.प.चे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील,पंचायत समिति सदस्य यतीश सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते धनराज पाटील,ग्रामपंचायत सदस्य माधवसिंग राजपूत भागवताचार्य,वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भोंगे मगराज,ता.उपाध्यक्ष श्री गुरूसेवा प्रतिष्ठान ह.भ.प.बाळासाहेब पाटील,शहर संघटक श्री गुरुसेवा प्रतिष्ठान संतोष माळी,भारत मंडप अँड केटरिंग चे संचालक जीवन चौधरी,सेवानिवृत्त मुख्याध्यापक सि.के महाले सर,प्रसिद्ध कवि यशवंत निकवाड़े सर,एस.बी.आय सेवानिवृत्त केशियर रामचंद्र पवार सर,विवेकानंद वारुळे,मंगलफूलपगारे आदि मान्यवर उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे अध्यक्ष विकास सेन,उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी,सचिव सौ.हेमलता येशी,खजिनदार कुलदीप राजपूत यांनी केले होते.