कुटे ग्रुपच्या ईफ्तार पार्टीतसामाजिक एकतेचे दर्शन!सर्व स्तरातील हिंदू- मुस्लिम बांधवांची उपस्थिती

0
202

बीड, प्रतिनिधी

हजारो हातांना सन्मानाचा रोजगार देत बीड जिल्ह्याचे नाव साता समुद्रापार घेऊन जाणार्‍या कुटे ग्रुपच्या वतीने सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी प्रत्येकवर्षी रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने यावर्षी मंगळवारी (दि.18) अमन लॉन्स येथे ईफ्तार पार्टी झाली. यावेळी हजारो मुस्लीम आणि हिंदु बांधवांची उपस्थिती होती. नेहमप्रमाणे यावर्षी देखील कुटे ग्रुपच्या रोजा- ईफ्तार पार्टीत सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन घडले.
बीडच्या कुटे ग्रुपने केवळ बीड, मराठवाडा, महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या काना- कोपर्‍यात आणि साता समुद्रापार असलेल्या विविध देशात वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपले जाळे निर्माण केले आहे. तिरूमला एडीबल ऑइल, तिरूमला कोकोनट ऑइल, तिरूमला पशुखाद्य आणि कुटे ग्रुप गुड मॉर्निंग डेअरीच्या माध्यमातून देशभरातील लाखो ग्राहक कुटे ग्रुपशी जोडले गेले आहेत. विदेशात देखील कुटे ग्रुपची उत्पादने जात असून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. कारण व्यवसायाबरोबर कुटे ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोना महामारी सारखे जागतिक संकट असो या छोटा- मोठा सामाजिक उपक्रम अथवा धार्मिक कार्यक्रम… कुटे ग्रुप चांगल्या आणि विधायक कामासाठी कायम पुढे असतो. सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. एवढ्या कडक उन्हाळ्यात देखील लाखो मुस्लिम बांधव पवित्र रमजान महिन्यात उपवास धरतात. सामाजाच्या भल्यासाठी प्रार्थना करतात. यामुळे मुस्लीम बांधवांचा ईफ्तार गोड व्हावा, सामाजिक सलोखा आणि एकता कायम रहावी, यासाठी कुटे ग्रुपच्या वतीने प्रत्येकवर्षी भव्य स्वरूपात ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. नेहमीप्रमाणे यावर्षी देखील अमन लॉन्स, बार्शी रोड बीड येथे आयोजित केलेल्या ईफ्तार पार्टीत हिंदु- मुस्लीम सलोखा आणि एकता पहायला मिळाली. या ईफ्तार पार्टीला हजारो हिंदु- आणि मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती. आलेल्या प्रत्येक बांधवाचे स्वागत कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेशराव कुटे, मॅनेजिंग डायरेक्टर अर्चनाताई कुटे, आर्यन कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटे ग्रुपचे सदस्यांनी केले.

चौकट…
जिल्ह्यावासीयांच्या बळामुळेच
कुटे ग्रुपची जगभरात घौडदौड
कुटे ग्रुपच्या सर्वच कंपन्या अन् उत्पादणे आज देश- विदेशात गुणवत्तेचे प्रतिक बनले आहेत. छोट्याशा जिल्ह्यातून झालेली सुरूवात आज नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावर पोहचली आहे. ही यशाची घौडदौड बीडकरांनी दिलेल्या पाठबळामुळे आहे. यामुळेच कुटे ग्रुप नेहमी समाजाचे देणे म्हणून सामाजिक, समाजाभीमूख आणि धार्मिक सलोख्याच्या कार्यक्रमात कायम पुढे असतो. सर्वांच्या पाठबळामुळे जाती- धर्माच्या पलीकडे जाऊन कुटे ग्रुप मानवतेच्या कल्याणासाठी काम करत आहे.

  • अर्चनाताई सुरेश कुटे

(मॅनेजिंग डायरेक्टर कुटे ग्रुप)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here