गेवराई (शुभम घोडके) क्रांतीसुर्य माहत्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने शिवस्वराज्य क्रिकेट क्लब यांच्या वतीने छत्रपती संभाजीराजे स्टेडीअमवर आयोजित तीन दिवशीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सिरसदेवीच्या जगदंबा संघाने ए.एम संघाचा पराभव करत 21,121/- रूपये व चषक हे प्रथम बक्षिस मिळवले तर ए.एम.संघाला व्दितीय 11,111/- व चषक तर शिवस्वराज्य संघाला तृतिय बक्षीस 5,555/- व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्याचे नाणेफेक जगदंबा संघाने जिकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.ए.एम संघाने प्रथम फलंदाजी करत 10 षटकात 86 धावा करत जगदंबा संघासमोर 87 धावाचे आव्हान दिले. जगदंबा संघाने ते 7.3 ओव्हर मध्ये ते पुर्ण केले. हा अंतिम सामना पाहण्यासाठी सहा.पोलीस निरीक्षक संतोष जंजाळ साहेब, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर तौर, राहुल खंडागळे, जेष्ठ पत्रकार सुभाष सुतार, कैलास हादगुले, शिवसेना नेते शिनूभाऊ बेदरे,पत्रकार तथा सरपंच भागवत जाधव, युवा नेते समाधान मस्के, रामेश्वर वादे, विजय वाघमारे यांची उपस्थिती होती.सर्व सामन्यांचे समालोचन व कार्यक्रमांचे सुत्रसंचालन आविनाश माळवदे यांनी केले तसेच हे चषक व्यवस्थित्या पार पाडण्यासाठी डिझायनर अरूण निकम,भरत मोटे, निखिल जोशी, शिवानंद स्वामी, नारायण वखरे, सचिन डोंगरे, जितेंद्र गायकवाड, सुरज सुतार, साहिल देशमुख, पांडुरंग चाळक, रवि शिंदे, योगेश चव्हाण, बाळू चव्हाण,सौरभ आर्दड,माऊली बेदरे,आकाश सोळंके,वैजिनाथ भाले,मनोज वादे,गणेश खैरे,सुनील पवार यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.