गेवराईचे सुपूत्र प्रशांत रुईकर ,अशोक कानगुडे नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात झळकणार

0
1679

गेवराई ( प्रतिनिधी ) – अनेक मराठी मालिका व चित्रपटातून भूमिका साकारणारा गेवराईचा भूमिपूत्र अभिनेता अशोक कानगुडे आणि अभिनेता प्रशांत रुईकर नागराज मंजुळे दिग्दर्शित “घर – बंदूक – बिर्याणी ” या मराठी चित्रपटात भूमिका करीत असून शुक्रवार दि ७ एप्रिल रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे . बीड येथील संतोषी माता व आशा चित्रपटगृहात ७ एप्रिल रोजी चित्रपट झळकणार आहे . या चित्रपटात अशोक कानगुडे यांची भूमिका सह खलनायकाची आहे तर प्रशांत रुईकर चंदूमामाचा रोल करीत आहेत .अशोक कानगुडे व प्रशांत रुईकर यांच्या वाटचालीसाठी ज्येष्ठ अभिनेते विधीज्ञ कमलाकर देशमुख ,सुभाष निकम, अभिनेते नंदू माधव, मकरंद अनासपुरे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता आकाश ठोसर, चित्रपट अभिनेते दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम ,विठ्ठल गोरडे, प्रा. राजेंद्र बरकसे, मुकुंद टाक, विष्णुप्रसाद खेत्रे, दिनकर शिंदे, प्रशांत रुईकर ,विलास बापू सोनवणे, प्रकाश दावणगिरे, विधिज्ञ एम. एस. इंदानी, संतोष वारे, एजाज अली, अविनाश कांबिलकर, अमोल धोंगडे,रोहित पुराणीक, कैलास टोणपे, दीपक गिरी, हारुण शेख, शिवकुमार सोनवणे, विवेक शर्मा, सौ. सीता राम महासाहेब, रंजित सराटे यांच्यासह नाट्य व चित्रपट सृष्टीतील कलावंतांनी अभिनेते अशोक कानगुडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here