पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा बनला डॉक्टर सुजीत हजारेंचे एमबीबीएस परिक्षेत घवघवीत यश

0
269

बीड, ( प्रतिनिधी ) बीड येथील पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा सुजीत हजारे हा डॉक्टर बनला असून, एमबीबीएस वैद्यकीय परिक्षेत शेवटच्या सुजीत हजारे यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

सुजीत हजारे यांनी लातूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेताना, अंतीम वर्षात दमदार यश मिळविले आहे. सुजीत हजारे यांचे प्राथमीक व माध्यमीक शिक्षण बीड येथील संस्कार विद्यालय तर महाविद्यालयीन शिक्षण बलभीम कॉलेज येथे झाले आहे. इयता बारावीच्या परिक्षेत तो बलभीम महविद्यालयातून सर्वप्रथम आला होता. नीट परिक्षेत उतुंग यश मिळविल्यानंतर, अहमदनगर येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रथम वर्षोला नंबर लागला होता, त्यानंतर शासकीय कोटयातून लातूर येथील शासकीय वैद्यकीय कॉलेजला नंबर लागला. एमबीबीएस सर्वच वर्षाच्या परिक्षेत तो कॉलेजमध्ये टॉपर राहिला आहे. डॉ. सुजीत हजारे यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here