पंतप्रधानानी पाठवलेल्या पोस्टकार्ड मधील प्रश्नाचे उत्तर द्यावीत – अँड श्रीनिवास बेदरे

0
94

बीड जिल्हा युवक काँग्रेसकडून पोस्टकार्ड मोहीम

गेवराई – (शुभम घोडके) बीड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई व मोदी आदानी भ्रष्टाचार संबंधी प्रश्न विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5000 पोस्ट कार्ड पाठवून मोहीम शुभारंभ पोस्ट कार्यालय,गेवराई येथे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड श्रीनिवास बेदरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने देशभरात पोस्ट कार्ड मोहीम सुरू करण्यात आलेले आहे. आज बीड जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पोस्टकार्डमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना विविध प्रश्न विचारून उत्तर देण्यासाठी पोस्ट कार्ड पाठवण्यात आले या पोस्ट कार्ड मध्ये राहुल गांधी यांच्यावर केलेल्या अन्यापूर्वक कारवाईवरील प्रश्न व मोदी आदानी यांच्यातील भ्रष्टाचारातील संबंध यावर विविध प्रश्न पाठवण्यात आलेले आहे. अँड श्रीनिवास बेदरे आपल्या मनोगत बोलताना म्हणाले देशाची वाटचाल हुकूमशाही कडे चालू आहे. राहुल गांधी वरील केलेली कारवाई लोकशाही विरोधी आहे.आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आज पोस्ट कार्ड आम्ही पंतप्रधानास पाठवीत आहे ते मध्येच गहाळ होईल. या पोस्ट कार्ड मधून पंतप्रधानास प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे असे ते म्हणाले.यावेळी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किरण अजबकर,वसंत सुसकर,बाळासाहेब आतकरे,योगेश बोबडे,बळीराम गिराम,शेख अल्ताफ, राजू पोपळघट,जिजा जगताप,रोहित घुनारे, युवराज माने,गणेश शिंदे व इतर युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here