गेवराई – बीड : गेवराई जि.बीड येथील प्रसिद्ध उद्योजक रवी जैस्वाल यांचा एकुलता एक मुलगा गुड्डू (30) जैस्वाल याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी येत असून, या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे. घटना 3 एप्रिल च्या पहाटे घडल्याची चर्चा आहे. या संदर्भात मंगळवारी ता. 4 रोजी आलेल्या फेसबुकवर पोस्ट व्हायरल झाली आहे.
दरम्यान, रवी जैस्वाल हे मोठे उद्योजक आहे. अंबाजोगाई येथील नेते पापा मोदी यांचे ते जवळचे पाहुणे आहेत. गेवराई जि.बीड येथे जैस्वाल यांचा मोठा उद्योग असून, त्यांची उच्चभ्रू उद्योजकांमध्ये गणना केली जाते. गुड्डू यांनी नेणक्या कोणत्या कारणाने आत्महत्या केली या विषयी अद्याप माहिती आलेली नाही. या घटनेने जिल्ह्यातील व्यावसायिक जगतात खळबळ उडाली आहे.