पुणे
ऐन उन्हाळ्यात राज्यात वीज दरवाढीचा शॉक लागू शकतो. हा शॉक लहान नाही अगदी ४४० व्होल्टचा हा शॉक असू शकतो. यंदा वीज दरात वाढीचा प्रस्ताव महावितरणने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2025 साठी हा प्रस्ताव आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व शेतकरी सर्वच वर्गासाठी वीजदारात मोठी वाढ होणार आहे. त्यावर 31 मार्च रोजी निर्णय होणार आहे. यामुळे वाढीव वीज बिल एप्रिलपासून मिळण्याची शक्यता आहे.